घरताज्या घडामोडीदूध पुन्हा महागलं; मदर डेअरीच्या दुधाच्या किमतीत वाढ

दूध पुन्हा महागलं; मदर डेअरीच्या दुधाच्या किमतीत वाढ

Subscribe

मागील अनेक दिवसांपासून महागाई मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. अशातच गेले काही दिवस सातत्याने वाढणारे दुधाचे दर पुन्हा एकदा वाढले आहे. त्यानुसार, मदर डेअरीने दुधाच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

मागील अनेक दिवसांपासून महागाई मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. अशातच गेले काही दिवस सातत्याने वाढणारे दुधाचे दर पुन्हा एकदा वाढले आहे. त्यानुसार, मदर डेअरीने दुधाच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मदर डेअरीने फुल क्रीम दुधामध्ये लीटरमागे एका रुपयाची वाढ केली आहे. तसेच टोकन दुधामध्ये लीटरमागे दोन रुपयांची वाढ केली आहे. (Milk prices hiked again by 1 and 2 rupees Mother Dairy took the decision in Delhi)

मदर डेअरीने दुधाचे दर वाढवण्याचा निर्णय घेतल्याने आता अन्य कंपन्याही पुन्हा दुधाच्या किंमती वाढवण्या शक्यता वर्तवली जात आहे. मदर डेअरीच्या दुधाच्या नव्या किंमती सोमवारपासून लागू होणार आहेत. ही दरवाढ दिल्ली आणि एनसीआरमध्ये करण्यात आली आहे. दूध उत्पादन खर्चात वाढ झाल्याने दुधाच्या किंमतीत वाढ करण्यात आल्याचे कंपनीने सांगितले.

- Advertisement -

मदर डेअरी दिल्ली एनसीआरमध्ये सर्वात मोठा पुरवठादार आहे. दर दिवशी कंपनी या भागात 30 लाख लीटर दुधाची विक्री करते. या दरवाढीनंतर मदर डेअरीच्या फुल क्रीम दुधाची किंमत 64 रुपये झाली आहे. कंपनीच्या प्रवक्त्याने ही माहिती दिली आहे. अर्ध्या लीटरच्या पॅकची किंमत बदललेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसीर, दिवाळीपूर्वी काही दिवस दूध उत्पादक कंपन्यांनी प्रती लीटरमागे 2 रुपयांची दरवाढ केली होती. त्यापूर्वी ऑगस्टमध्ये दरवाढ करण्यात आली होती. मदर डेअरीने अशाप्रकारे यंदा चौथ्यांदा दूध दरात वाढ केल्याचे समजते.

- Advertisement -

याआधी मुंबईत १ सप्टेंबरपासून सुटे आणि ताज्या दुधाच्या किमतीत पाच रुपयांची वाढ करण्याचा निर्णय दूध उत्पादक महासंघाने घेतला होता. शिवाय, अमूलने दुधाच्या दरात ऐन दिवाळीत वाढ केल्याने सर्वसामान्यांना महागाईचा मोठा फटका बसला आहे. अमुलने दिल्लीत दुधाच्या दरात २ रुपयांनी वाढ केली होती.


हेही वाचा – कर्नाक पुलाचे पाडकाम पूर्ण; लोकल वाहतूक सुरू

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -