घरताज्या घडामोडीकर्नाक पुलाचे पाडकाम पूर्ण; लोकल वाहतूक सुरू

कर्नाक पुलाचे पाडकाम पूर्ण; लोकल वाहतूक सुरू

Subscribe

मध्य रेल्वेमार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. कर्नाक पुलाच्या पाडकामासाठी बंद केलेली लोकल वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे. कर्नाक पुलाचे गर्डर काढण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर मध्य रेल्वे प्रशासनाने ओव्हरहेड व्हायर झोडत पुन्हा लोकल वाहतूक सुरळीत सुरू केली.

मध्य रेल्वेमार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. कर्नाक पुलाच्या पाडकामासाठी बंद केलेली लोकल वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे. कर्नाक पुलाचे गर्डर काढण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर मध्य रेल्वे प्रशासनाने ओव्हरहेड व्हायर झोडत पुन्हा लोकल वाहतूक सुरळीत सुरू केली. त्यानुसार पहिली लोकल दुपारी 4 वाजताच्या सुमारास धावली. ही लोकल सीएसएमटीहून ठाण्याला जाणारी धिमी लोकल होती. (Demolition of Karnak Bridge completed Local transport started)

मुंबई ते मशीद रेल्वे स्थानकादरम्यान 1868 मध्ये बनवण्यात आलेल्या ब्रिटिशकालीन कर्नाक पुलाचे पाडकाम निर्धारित वेळेत पूर्ण करण्यात आले. कर्नाक पूलाच्या पाडकामासाठी मध्य रेल्वेकडून 27 तासांचा मोठा ब्लॉक घेण्यात आला होता. या ब्लॉकमुळे अनेक लोकल सेवांसह मेल आणि एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र, मध्य रेल्वेने अतिशय काटेकोरपणे नियोजनबद्ध पद्धतीने 27 तासांच्या मेगाब्लॉकमध्ये 17 तासातच मेन लाईनची लोकल सेवा सुरु केली, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली.

- Advertisement -

याशिवाय, हार्बर लाईनची लोकल सेवा ठरलेल्या वेळेनुसार म्हणजेच रात्री 8 वाजता सुरु केली जाणार असल्याचीही माहिती शिवाजी सुतार यांनी दिली. तसेच, जलद आणि धीम्या या दोन्ही मार्गाची वाहतूक पूर्णपणे सुरु झाली असून, मध्य रेल्वेवरील यार्ड लाईन ज्यावरून एक्सप्रेस रेल्वे धावतात, त्याचे काम अद्यापही सुरु आहे. मात्र, हे कामही लवकरात लवकर पूर्ण केले जाणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

या ब्लॉकदरम्यान दोन्ही बाजूला मोठ-मोठ्या क्रेन्स लावून, कटरच्या साहाय्याने लोखंड कापून पुलाचा साचा बाजूला काढण्यात आला. या कामात 500 हून अधिक तज्ज्ञ अधिकारी, कर्मचारी ट्रॅकवर उतरले होते. या ब्लॉकदरम्यान 1 हजार 96 लोकल रद्द करण्यात आल्या होत्या.

- Advertisement -

पूल तोडण्यासाठी रेल्वेचे नियोजन

  • कर्नाक पुलाच्या स्टीलच्या सांगाड्याची लांबी – 50 मीटर आणि रुंदी -18.8 मीटर
  • सांगाड्यात एकूण 7 स्पॅन होते
  • या स्पॅनचे 44 तुकडे करण्यात आले.
  • एकावेळी एकच तुकडा उचलण्यात आला .
  • 18 तुकड्यांचे प्रत्येकी वजन 16 टन
  • 14 तुकड्यांचे प्रत्येकी वजन 3 टन
  • 12 तुकड्यांचे प्रत्येकी वजन 10 टन
  • 350 टन वजनी क्षमतेच्या 3 क्रेन
  • 500 टन वजनी क्षमतेची एक क्रेन

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, भायखळा, दादर, ठाणे, वडाळा रोड आणि पनवेल, नाशिक, पुणे आणि इतर प्रमुख स्थानकांवर ब्लॉकमुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी मदतकक्ष सुरू करण्यात आले होते. हे मदतकक्ष आरपीएफ आणि स्टेशन कर्मचार्‍यांच्या मदतीने तिकीट तपासणी कर्मचार्‍यांकडून चालवण्यात आले.

महत्त्वाच्या स्थानकांवर अतिरिक्त आरक्षण /रद्दीकरण काउंटर देखील उघडण्यात आले आहेत आणि प्रवाशांच्या फायद्यासाठी अतिरिक्त ATVM सुविधाकारांना सेवेत आणण्यात आले आहे. शॉर्ट ओरिजिनेशन, टर्मिनेशन, मेल/एक्स्प्रेस ट्रेन्सचे रीशेड्युलिंग आणि उपनगरीय गाड्यांची माहिती यासंबंधी सतत घोषणा करण्यात आल्या.


हेही वाचा – ट्विटर, मेटा, अॅमेझॉननंतर सिस्को आणि झोमॅटोमध्येही होणार कर्मचारी कपात

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -