घरताज्या घडामोडीआंतरराष्ट्रीय विमानसेवा आता ३१ जुलैपर्यंत राहणार स्थगित, DGCAचा आदेश

आंतरराष्ट्रीय विमानसेवा आता ३१ जुलैपर्यंत राहणार स्थगित, DGCAचा आदेश

Subscribe

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील स्थगितीची मुदत वाढवण्यात आली आहे. ३१ जुलैपर्यंत आंतरराष्ट्रीय विमानसेवा स्थगित राहणार आहे. डीजीसीए (Directorate General of Civil Aviation) म्हटले आहे की, काही निवडक मार्गावर विमानांना उड्डाण भरण्यासाठी परवानगी दिली आहे. दरम्यान वेगवेगळ्या गोष्टी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. माहितीनुसार, कोरोना महामारीमुळे भारतात २३ मार्च २०२०पासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा स्थगित केली होती.

भारत सरकारने मे २०२०मध्ये वंदे भारत मिशनच्या माध्यमातून आणि जुलै २०२०मध्ये एअर बबर अरेंजमेंटद्वारे विमान सेवा सुरू केली होती. याद्वारे वेगवेगळ्या देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणले गेले होते. भारताने ज्या देशांसाठी या योजनेच्या अंतर्गत विमान सेवा सुरू केली होते, त्यामध्ये २४ देशांचा समावेश होता. ज्यामध्ये अमेरिका, ब्रिटन, संयुक्त अरब अमिरात, केन्या, भुतान आणि फ्रान्स या देशांचा देखील समावेश होता. एअर बबल कराराअंतर्गत दोन देशांदरम्यान विशेष विमाने चालविली गेली.

- Advertisement -

डीजीसीएद्वारे जारी केलेल्या निवेदनात सांगितले आहे की, आंतरराष्ट्रीय कार्गो विमान आणि त्यासंबंधित असलेल्या कोणत्याही विमानाला बंदीचा आदेश लागू होणार नाही. याचा अर्थ असा की, ते पहिल्याप्रमाणे येतील आणि जातील. भारत सरकारने जारी केलेल्या निवेदनात म्हटले होते की, वंदे भारत मिशन अंतर्गत २१ मार्च २०२१ पर्यंत कोरोनामुळे दुसऱ्या देशात अडकलेल्या जवळपास ६७.५ मिलियनहून अधिक लोकांना स्वदेशी परत आणण्यात आले आहे. याबाबतची माहिती स्वतः विमान वाहतूक मंत्री हरदीप सिंह यांनी ट्वीटच्या माध्यमातून दिली होती.


हेही वाचा – New Virus: कोरोना रुग्णांमध्ये आता नवं संकट; ‘या’ नव्या व्हायरसमुळे देशात एकाचा मृत्यू!


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -