घरदेश-विदेशमिझोराममध्ये मिझो नॅशनल फ्रंटचा अटकेपार झेंडा!

मिझोराममध्ये मिझो नॅशनल फ्रंटचा अटकेपार झेंडा!

Subscribe

मिझारोमच्या २०१८ विधानसभा निवडणूकीत मिझो नॅशनल फ्रंट या पक्षाचा बहुमताने विजय झाला आहे. या पक्षाने सर्वाधिक असे २६ जागांचे घवघवीत यश मिळवले आहे. तर काँग्रेसचा मिझोराममध्ये फज्जा उडाला आहे.

२०१८ लोकसभा निवडणूकीचा निकाल आज जाहीर झाला आहे. या विधानसभा निवडणूकीत मिझो नॅशनल फ्रंटने (एमएनएफ) अटकेपार झेंडा फडकवला आहे. या पक्षाला सर्वाधिक अशा २६ जागांवर विजय मिळाला आहे. शिवाय, या निवडणूकीत मिजोरामध्ये कॉंग्रेसचा फज्जा उडाला आहे. गेल्या दहा वर्षांपासून मिझोराममध्ये कॉंग्रेसची सत्ता होती. परंतु, या दहा वर्षांनंतर मिझोराममध्ये मोठी सत्तापालट झालेली बघायला मिळत आहे. या निवडणूकीत कॉंग्रेसला फक्त ५ जागेंवर विजय मिळाल आहे. विशेष म्हणजे या निवडणूकीत मिझोरामचे पाच वेळा मुख्यमंत्री ठरलेले पी. ललथनहवला यांना सत्तेतून पायउतार व्हावे लागले आहे. ते चंफाई साऊथ आणि सेरछिप अशा दोन मतदार संघातून उभे होते. परंतु, मिझोरामच्या जनतेने त्यांना घरचा आहेर दिला आहे.

वाचा – Mizroam Election 2018: १० वर्षांनंतर सत्तापालट, मिझो फ्रंट विजयी

- Advertisement -

एमएनएफची मोठी भरारी

गेल्या विधानसभा निवडणूकीत म्हणजे २०१३ च्या निवडणूकीत एमएनएफचे फक्त ५ आमदार निवडून आले होते. यावेळी काँग्रेसचे तब्बल ३४ जागांनी विजय झाला होता. परंतु, या पाच वर्षांनंतर एमएनएफला मोठे यश मिळाले आहे. त्याखालोखाल अपक्षांना ७ जागांवर विजय मिळाला आहे. तर काँग्रेसचे ५ जागांवर उमेदवार निवडून आले आहेत. मिझोराममध्ये भाजपने देखील खाते उघडले आहे. यावेळी भाजपचा १ उमेदवार निवडून आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -