घरदेश-विदेशModi Cabinet Expansion : रावसाहेब दानवे, संजय धोत्रेंचा राजीनामा? दिल्लीत घडामोडींना वेग

Modi Cabinet Expansion : रावसाहेब दानवे, संजय धोत्रेंचा राजीनामा? दिल्लीत घडामोडींना वेग

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळाचा विस्तार आज संध्याकाळी सहा वाजता होणार आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीत घडामोडींना वेग आला आहे. मंत्रीमंडळाच्या पार्श्वभूमीवर चार मंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे आणि संजय धोत्रे यांनीही मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचं वृत्त आहे. मात्र, दानवेंच्या राजीनाम्याबाबत अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

रावसाहेब दानवे हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. दानवेंकडे केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रीपदाची जबाबदारी आहे. मात्र, कामगिरी चांगली नसल्याने त्यांना डच्चू देण्यात आल्याची माहिती मिळतेय. रावसाहेब दानवे हे जालन्यातील भोकरदन तालुक्यातील खासदार आहेत.

- Advertisement -

रावसाहेब दानवे यांच्यासोबत खासदार संजय धोत्रे यांनी देखील मंत्रीपदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर येत आहे. धोत्रे यांच्याकडे मनुष्यबळ विकास मंत्रालयातील राज्यमंत्रीपद आहे. धोत्रेंच्या कामगिरीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी समाधानी नसल्याने त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिल्याचं सांगितलं जात आहे. संजय धोत्रे हे अकोल्यातील खासदार आहेत.

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी मंत्र्यांचे राजीनामे

केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक, केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. यासोबतच महिला आणि बालकल्याण मंत्री देबाश्री चौधरी यांना मंत्रिमंडळातून हटवलं जाणार आहे. त्यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आल्याचं बोललं जातं आहे. केंद्रीय रसायन आणि खते मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांनी देखील राजीनामा दिल्याचं वृत्त आहे.

- Advertisement -

४३ नेत्यांचा शपथविधी

आज सायंकाळी ६ वाजता होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात ४३ मंत्र्यांना शपथ दिली जाण्याची शक्यता आहे. सध्या मोदींच्या मंत्रिमंडळात ५३ मंत्री आहे, ही संख्या वाढून ८१ होणार आहे.

 


हेही वाचा – राणे, कपिल पाटलांचं मंत्रिपद निश्चित? मोदींच्या निवासस्थानी दाखल


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -