आता विद्यार्थ्यांना केमिस्ट्रीसोबत म्युझिक, फिजिक्स सोबत फॅशन डिझायनिंग शिकता येणार

modi cabinet new education policy students can do fashion designing with physics honors tedu
आता विद्यार्थ्यांना केमिस्ट्रीसोबत म्युझिक, फिजिक्स सोबत फॅशन डिझायनिंग शिकता येणार

केंद्रातील मोदी सरकारने नवीन शैक्षणिक धोरणाला मान्यता दिली आहे. यामध्ये सरकारने विद्यार्थ्यांना अनेक प्रकारचा दिलासा दिला आहे. तब्बल ३४ वर्षानंतर आलेल्या नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत शाळा- महाविद्यालयीन प्रणालीत मोठे बदल करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना महाविद्यालयात केवळ फिजिक्स सोबत केमिस्ट्री, गणित शिकू शकत होते. परंतु आता विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत फिजिक्ससोबत फॅशन डिझायनिंग आणि केमिस्ट्रीसोबत म्युझिक शिकता येणार आहे. याबाबत आज सरकारने पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे.

सरकारकडून सांगण्यात आले की, नव्या शैक्षणिक धोरणात फिजिक्स ऑनर्ससोबत केमिस्ट्री, गणित शिकता येईल. पण हे विषय शिकत असताना सध्या फॅशन डिझायनिंग आणि म्युझिक शिकता येत नाही. पण नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत आता हे शक्य होणार आहे. फिजिक्ससोबत फॅशन डिझायनिंग आणि केमिस्ट्रीसोबत म्युझिक शिकता येणार आहे. दरम्यान या नव्या धोरणानुसार बोर्डाच्या परिक्षेचे महत्त्व कमी केले आहे. त्यानुसार १० वी आणि १२ बोर्ड रद्द करण्यात आले आहेत.

तसेच या नवीन धोरणानुसार पाचवीपर्यंत विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण देण्यावर भर दिला जाईल. शिवाय एम.फील ड्रिग्री बंद होईल. शालेय शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर वाढण्यावर भर देण्यात येणार असल्याचे सरकारने सांगितले आहे. तसेच काही कारणांमुळे अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षण घेता येणार आहे.


हेही वाचा – देशात नवा Education पॅटर्न, १० वी १२ वी बोर्ड रद्द!