Maharashtra Lockdown: मॉल सुरु, बाईकवर डबलसीटला परवानगी; वाचा संपुर्ण नियमावली

Chief minister Uddhav Thackeray | Cabinet Decision
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

केंद्र सरकारने आज सायंकाळी अनलॉक ३ सोबतच कटेंनमेंट झोनमध्ये लॉकडाऊन ३१ ऑगस्टपर्यंत कायम ठेवल्यानंतर आता ठाकरे सरकारनेही लॉकडाऊनमध्ये वाढ केली आहे. राज्य सरकारचेवतीने यासंबंधीची नियमावली जाहीर केली आहे. तसेच मिशन बिगीन अगेन अंतर्गत लॉकडाऊनचे काही नियम देखील शिथील करण्यात आले आहेत. महत्त्वाचे म्हणजे मोटारसायकलवर डबलसीट जाणाऱ्यांना मागच्या काळात परवानगी नाकारण्यात आली होती. त्यामुळे राज्यातील नागरिक हैराण झाले होते. आता नव्या नियमावली नुसार बाईकवर दोन जणांना प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र प्रवासादरम्यान मास्क वापरणे सक्तीचे करण्यात आले आहे.

काय सुरु होणार?

– अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकाने स्थानिक महानगरपालिकेच्या नियमानुसार सकाळी ९ ते रात्री ७ पर्यंत सुरु राहतील.

– दारूच्या दुकानांना होम डिलीव्हरीचा पर्याय खुला राहिल.

– मॉल्स आणि मार्केट कॉम्पलेक्स ५ ऑगस्ट पासून सकाळी ९ ते रात्री ७ पर्यंत खुले ठेवण्यात येतील. मात्र त्यात थिएटर, फूड कोर्ट, रेस्टॉरंट सुरु करता येणार नाहीत. रेस्टॉरंटचे किचन होम डिलिव्हरीसाठी सुरु करता येऊ शकते.

– आऊटडोअर खेळ जसे की गोल्फ, टेनिस, फायरिंग, बॅडमिंटन, मल्लखांब अशा खेळांना सोशल डिस्टसिंगचे नियम पाळून सुरु करण्यात आले आहे. मात्र स्विमिंग पूलसाठी परवानगी देण्यात आलेली नाही.

– टॅक्सी, चार चाकी गाडी, कॅबमध्ये चालकासहीत तीन प्रवासी, रिक्षामध्ये चालकासहीत दोन प्रवासी आणि मोटारसायकलवर दोन प्रवाशांना प्रवासाची मुभा