घरदेश-विदेशMonsoon Forecast 2022 : विजांच्या कडकडाटासह 'या' राज्यांत पावसाची शक्यता, महाराष्ट्रात काय...

Monsoon Forecast 2022 : विजांच्या कडकडाटासह ‘या’ राज्यांत पावसाची शक्यता, महाराष्ट्रात काय स्थिती?

Subscribe

देशातील बहुतांश राज्यांमध्ये उष्णतेचा प्रकोप वाढतो. मात्र दुसरीकडे देशातील काही राज्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने व्यक्त केली आहे. त्यामुळे नागरिकांना भर उन्हाळ्यात देखील ऊन- पाऊस खेळाचा अनुभव येणार आहे. दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसात अवकाळी पाऊसाची शक्यता असतेच मात्र यंदा अवकाळी पावसाचा मुक्काम दिवसेंदिवस वाढतच आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, केरळ, दक्षिण कर्नाटक, तमिळनाडु आणि दक्षिण महाराष्ट्रात आज विजांच्या कडकडाटासह गारपीठ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रातील स्थिती काय?

दरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात पुढील दोन दिवस मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवला आहे. एकीकडे विदर्भातही तापमान वाढत असून अकोल्यात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. मात्र पुढील काही दिवस तापमान अधिक वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

तर दुसरीकडे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता वर्तवली जात आहे, या भागात 13 ते 14 एप्रिलदरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. बुधवारी मराठवाड्यात दिवस उजाडल्यापासून ढगाळ वातावरण आहे. तर पश्चिम महाराष्ट्रात काही भागात गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली आणि कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात जोरदार मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात गारपिटीसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. दरम्यान काही दिवसांपासून कोकणातील काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.


New York Shooting Suspect : ब्रुकलिन मेट्रो स्टेशन गोळीबार प्रकरणातील संशयिताची ओळख पटली; संशयिताचे फोटो जारी


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -