CoronaVirus : जगात ७८ लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची संख्या

भारत आता कोरोनाचा फटका बसलेल्या जगभरातील देशांमध्ये चौथ्या क्रमांकावर आला आहे.

जगभरासह देशात दिवसागणिक कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात सलग चौथ्या दिवशी तीनशेहून अधिक मृत्यू झाले आहेत. तर जगाच्या आकडेवारीनुसार, कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या ७,८७५,९३२ एवढी आहे. तर कोरोना मृतांची संख्या ४,३२,५१९ असून बरे झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या ४,०४४,२९० आहे. भारत आता कोरोनाचा फटका बसलेल्या जगभरातील देशांमध्ये चौथ्या क्रमांकावर आला आहे. सिक्कीम, लडाखसारख्या या ईशान्येकडील भागांमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेच्या आकडेवारीनुसार, आत्तापर्यंत ५५ लाख ७ हजार १८२ नमुना चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

चार राज्यात सर्वाधिक रुग्ण

महाराष्ट्र, तमिळनाडू, दिल्ली, गुजरात या चार राज्यांमध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. महाराष्ट्राने १ लाखाचा आकडा पार केला आहे तर, दिल्लीमध्ये ३६ हजारून अधिक रुग्णांनी नोंद झाली आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये २१३७ रुग्णांची वाढ झाली. एकूण मृत्यूही १,२१४ झाले आहेत.

जगाची आकडेवारी (कोरोना व्हायरस)

देश               रुग्ण संख्या       मृत्यू        बरे रुग्ण

१) यूएसए     २१४२२२४     ११७५२७   ८५४१०६

२) ब्राझील    ८५०७९६        ४२७९१    ४३७५१२

३) रशिया      ५२०१२९         ६८२९    २७४६४१

४)भारत         ३२१९६३      ९२०४    १६२४३९

५) युके         २९४३७५        ४१६६२     –