घरताज्या घडामोडीपगारवाढीसाठी या देशात सैनिकांचे बंड? राष्ट्रपती- पंतप्रधानांना घेतलं ताब्यात

पगारवाढीसाठी या देशात सैनिकांचे बंड? राष्ट्रपती- पंतप्रधानांना घेतलं ताब्यात

Subscribe

आफ्रीकेमधील माली देशामध्ये सरकारविरोधात सैनिकांनी बंड पुकारले आहे.

आफ्रीकेमधील माली देशामध्ये सरकारविरोधात सैनिकांनी बंड पुकारले आहे. या बंडात सैनिकांनी राष्ट्रपती इब्राहिम बुबाकार केटा यांना ताब्यात घेतलं आहे. मालीच्या राष्ट्रपतींबरोबर या देशाचे पतंप्रधान बोबू सिसे यांनाही ताब्यात घेतलं आहे. या दोघांनाही बंदूकीचा धाक दाखवून सैनिकांनी शरण येण्यास सांगितले. रॉयटर्सने याबबात वृत्त दिले आहे.

मंगळवारी मालीची राजधानी असणारा बामाकोजवळ एका लष्करी तळावर सैनिकांच्या दोन गटांमध्ये वाद झाला आणि त्यामधूनच हा संघर्ष सुरु झाला. राष्ट्रपती इब्राहिम बुबाकार यांनी राजीनामाही दिला आहे.  यामध्ये अनेक ठिकाणी जाळपोळही झाली. बामाकोपासून १५ किमीवर असणाऱ्या काटी येथील लष्करी तळावरील नाराज कनिष्ठ अधिकाऱ्यांनी अनेक कमांडर्सला ताब्यात घेतलं. त्यानंतर त्यांनी या लष्करी तळावर ताबा मिळवला. त्यानंतर अनेक ठिकाणी शहरातील इमारतींना आग लावली.

- Advertisement -

बंड पुकारणाऱ्या सैनिकांना घेतलं ताब्यात

राष्ट्रपतींनी राजीनामा द्यावा यासाठी बऱ्याच दिवसांपासून देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये आंदोलने सुरू होती. आता राष्ट्रपती हे बंड पुकारणाऱ्या सैनिकांच्या ताब्यात आहेत. पण आता या सैनिकांनी सरकारबरोबर कोणत्याही प्रकारची चर्चा न करण्याचा निर्णय घेतला आहे.

पगारवाढीसाठी बंड?

बामाकोबरोबरच अन्य ठिकाणी तरूणांनी सरकारी इमारतींना आग लावल्याच्या घटना घडल्या आहेत. बंड पुकारणाऱ्या सैनिकांनी राष्ट्रपतींना ताब्यात घेत राजीनामा देण्याची मागणी केली. बीबीसी आफ्रीकाने दिलेल्या माहितीनुसार बंड पुकारणाऱ्या सैनिकांचे नेतृत्व काती येथील लष्करी छावणीतील डेप्युटी हेड कर्नल मलिक डियाओ आणि कमांडर जनरल सादियो कमारा या दोघांनी केलं आहे. सैनिकांनीच का बंड पुकारले याबद्दल ठोस कारण समोर आले नाहीये. मात्र स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार पगार वाढवण्यासंदर्भातील लष्करी अधिकाऱ्यांच्या मागणीच्या वाढीसाठी हे बंड केल्याचं म्हटलं जात आहे. आफ्रीकन राष्ट्रांच्या गटाने आणि स्थानिक ग्रुप इकोवासने या बंडाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – ‘या’ कारणामुळे चिमुरड्यांची झाडावर भरते ऑनलाईन शाळा!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -