Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश NaMo App AI Tech : आता पीएम मोदींसोबत मिळवता येईल फोटो, जाणून घ्या सविस्तर

NaMo App AI Tech : आता पीएम मोदींसोबत मिळवता येईल फोटो, जाणून घ्या सविस्तर

Subscribe

नमो अॅपमध्ये फोटो बूथ नावाचे एक नवीन फीचर अपडेट करण्यात आले आहे. जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संबंधित प्रत्येक स्मृती जतन करण्याचे काम करेल आणि सामान्य लोकांना देखील शेअर करेल.

तुम्ही कधी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत फोटो काढला आहे का? किंवा तुम्ही त्यांच्यासोबत काढलेला फोटो कुठे हरवला आहे का? असं असेल तर चिंता करु नका. कारण, आता नमो अॅपवर असे एक Feature आले आहे, जे एआय तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. त्यामुळे हे तंत्रज्ञान तुमचा हरवलेला फोटो शोधण्याचे काम करेल. नमो अॅपमध्ये फोटो बूथ नावाचे एक नवीन फीचर अपडेट करण्यात आले आहे. जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संबंधित प्रत्येक स्मृती जतन करण्याचे काम करेल आणि सामान्य लोकांना देखील शेअर करेल.

AI तंत्रज्ञानाने सुसज्ज नमो अॅप

एका अधिकाऱ्याने सांगितले की, नमो अॅप आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीचे छायाचित्र स्कॅन करून ते पंतप्रधानांच्या फोटोशी जोडून तुमच्यासमोर ठेवतो. अधिकारी पुढे म्हणाले की, आतापर्यंत फक्त खासदार, आमदारांसारखे लोकच पंतप्रधान मोदींसोबत त्यांचा फोटो लावू शकत होते. परंतु आता केव्हाही पंतप्रधानांसोबत क्लिक झालेल्या सामान्य माणसाचे छायाचित्रही या तंत्रज्ञानाच्या आधारे त्या संबंधित व्यक्तीला सापडू शकते. एवढेच नाही तर नमो अॅपवर असलेला तुमचा फोटोही तुम्ही डाउनलोड करू शकता.

- Advertisement -

( हेही वाचा: कोरोनाचा धोका वाढतोय, राज्यात ४०० हून अधिक नवे रुग्ण; तुमच्या शहराची स्थिती काय? )

पीएम मोदींशी संबंधित या अॅपवर एक टीम बराच काळ काम करत होती. सुरुवातीला नमो अॅपवर फक्त ३० दिवसांत क्लिक केलेले फोटोच उपलब्ध होते, पण आता जुने फोटोही अॅपवर उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नमो अॅप हे पहिलेच प्लॅटफॉर्म आहे, जे अशा तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकदा सांगितले होते की, त्यांनी सुरुवातीपासून तंत्रज्ञानाचा वापर केला नसला तरी प्रत्येक नवीन गोष्ट शिकली पाहिजे. ते स्वतःही तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. पीएम मोदींनी खासदारांना तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा सल्लाही दिला होता.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -