घरदेश-विदेशभाजपचे मिशन २०२४; पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार रॅलींची सेंच्युरी

भाजपचे मिशन २०२४; पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार रॅलींची सेंच्युरी

Subscribe

२०२४ ची लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने ब्ल्यू प्रिंट तयार केली आहे. पश्चिम बंगाल, ओडिशा आणि दक्षिण भारतातील राज्ये येथे लक्ष्य केंद्रीत करण्याचे नियोजन भाजपने केले आहे. त्याचाच भाग म्हणून पंतप्रधान मोदी यांच्या १०० रॅलींचे नियोजन करण्यात आले आहे. मोठ्या विकास कामांच्या घोषणा करणे, महिला आणि अल्पसंख्याकांना लाभ देणे हे या रॅलींचे मुख्य उद्दिष्ट असणार आहे.

 

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १०० रॅलींचे नियोजन भाजपने केले आहे. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांचे लक्ष्य ठेवून पंतप्रधान मोदी यांच्या रॅलींचे नियोजन करण्यात आले आहे. हे वर्ष संपण्याआधी पंतप्रधान मोदी रॅलींची सेंच्युरी करणार आहेत.

- Advertisement -

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,  २०२४ ची लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने ब्ल्यू प्रिंट तयार केली आहे. पश्चिम बंगाल, ओडिशा आणि दक्षिण भारतातील राज्ये येथे लक्ष्य केंद्रीत करण्याचे नियोजन भाजपने केले आहे. त्याचाच भाग म्हणून पंतप्रधान मोदी यांच्या १०० रॅलींचे नियोजन करण्यात आले आहे. मोठ्या विकास कामांच्या घोषणा करणे, महिला आणि अल्पसंख्याकांना विविध योजनांचा लाभ देणे हे या रॅलींचे मुख्य उद्दिष्ट असणार आहे. सुमारे १६० मतदारसंघांपर्यंत पोहोचण्याचे भाजपचे ध्येय आहे.

भाजपच्या ब्ल्यू प्रिंटमध्ये पक्षातील प्रत्येक घटकावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. महिला मोर्चा आघाडीला तर महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष आराखडा तयार करण्याची सुचना देण्यात आली आहे. अल्पसंख्याक आघाडीला १० राज्ये व एक केंद्र शासित प्रदेश येथे प्रत्यक्षात रस्त्यावर उतरुन काम करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. ६० लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी अल्पसंख्याक आघाडीला देण्यात आली आहे. त्यासाठी खास यादी तयार करण्यात आली आहे.

- Advertisement -

नुकतीच नागालॅंड, त्रिपुरा व मेघालय विधानसभा निवडणुका झाल्या. नागालॅंड, त्रिपुरा येथे सत्ता स्थापन करण्यात भाजपला यश आले. तर मेघालय येथे भाजपने सत्ताधाऱ्यांना पाठिंबा दिला आहे. आगामी काळातही काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांचे नियोजन भाजपने जानेवरी २०२३ मध्ये झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीतच केले. १६ आणि १७ जानेवरी २०२३ रोजी ही बैठक झाली. दोन दिवसांच्या बैठकीत मुखतः संघटना वाढवण्यावर चर्चा झाली. निवडणुका होणाऱ्या राज्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांना बैठकीत विशेष मार्गदर्शन केले गेले. निवडणुकांसाठी काय तयारी केली आहे याची माहितीही तेथील पदाधिकाऱ्यांकडून घेतली गेली व त्यानुसार निवडणुकांचे नियोजन भाजपने केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -