Union Budget 2023 : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन जाहीर; ‘या’ दिवशी होणार बजेट सादर

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून सुरू होणार आहे. हे अधिवेशन 6 एप्रिलपर्यंत चालणार आहे. नेहमीच्या सुट्टीसह 66 दिवसांमध्ये 27 बैठका होणार आहेत. ही सुट्टी 14 फेब्रुवारी ते 12 मार्चपर्यंत अवकाश घेतला जाणार आहे.

यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना आयकरात सूट मिळणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पाची सामान्यांसह मध्यमवर्गीय लोक वाट पाहत आहेत. अशातच आता या लोकांची प्रतिक्षा संपणार आहे. कारण केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाची घोषणा करण्यात आली आहे. (national budget session 2023 of parliament will commence from 31 january and continue till 6 april)

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून सुरू होणार आहे. हे अधिवेशन 6 एप्रिलपर्यंत चालणार आहे. नेहमीच्या सुट्टीसह 66 दिवसांमध्ये 27 बैठका होणार आहेत. ही सुट्टी 14 फेब्रुवारी ते 12 मार्चपर्यंत अवकाश घेतला जाणार आहे. 12 मार्चपासून अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ही माहिती दिली आहे.

1 फेब्रुवारी 2023ला अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. हा अर्थसंकल्प सादर करत असताना सरकारचे लोकसभा निवडणुकीवर विशेष लक्ष असणार आहे. तसेच, संभाव्य मंदीचाही सरकारला सामना करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, संसदेच्या हिवाळी अधिवेशनात गदारोळ झाला होता. तवांगच्या मुद्द्यावरून 17 विरोधी पक्षांनी राज्यसभेतून सभात्याग केला. विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही याप्रकरणी विरोधी पक्षांची बैठक बोलावली होती. यासोबतच खरगे यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील वादग्रस्त वक्तव्यावरून संसदेत चांगलाच गदारोळ झाला. यामुळेच संसदेचे हिवाळी अधिवेशन मुदतीपूर्वीच संपुष्टात आले.


हेही वाचा – एसटी कर्मचाऱ्यांची संक्रांत गोड होणार, शासनाकडून 300 कोटींचा निधी उपलब्ध