घरट्रेंडिंगCAA चा विरोधानंतर जावेद जाफरीने सोडलं सोशल मीडिया

CAA चा विरोधानंतर जावेद जाफरीने सोडलं सोशल मीडिया

Subscribe

अभिनेता जावेद जाफरी यांनी रविवारी सोशल मीडिया सोडण्याचा निर्णय घेतला. ट्रोलींग आणि तिरस्काराला संतापून त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात देशभरात अनेक राज्यातून आंदालनाद्वारे आक्रोश व्यक्त करण्यात आला आहे. मुंबईतही १९ डिसेंबर रोजी ऑगस्ट क्रांती मैदानावर नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (NRC) या विरोधात आंदोलन करण्यात आले होते. मुंबईतल्या अनेक भागातून हजारो लोक या आंदोलनात सामिल झाले होते आणि त्यामध्ये अनेक अभिनेते, दिगर्दशक त्या ठिकाणी उपस्थीत होते. कलाकार स्वरा भास्कर आणि जावेद जाफरी यांनी त्या ठिकाणी भाषण देखील केले. तर अभिनेता जावेद जाफरी हे CAA NRCच्या विरोधात असून त्यांनी अनेकदा सोशल मीडियावर याबद्दल भाष्य केले आहे. मात्र रविवारी त्यांनी एक ट्विट केले ज्यामध्ये ते म्हणाले की ज्या तिरस्काराला आणि ट्रोल्सला त्यांना सामोरे जावे लागत आहे ते त्यांना आता सहन होत नाही आणि त्यामुळे ते सोशल मीडिया सोडत आहे. परिस्थिती सुधारल्यास ते परत येतील.

”सगळे म्हणायचे की कॉंग्रेस हे पक्ष भ्रष्ट आहे आणि मी ते मान्य करायचो, पण तुम्ही तरी काय करता आहात? (भाजप) तुम्ही म्हणालात तुम्ही शाळा बनवणार, तुम्ही शिक्षण, बेरोजगारी, आरोग्य धोरण सुधारणार पण तुम्ही त्यामधले काहीच करत नाही. त्या ऐवजी तुम्ही म्हणतात, ‘हम मंदिर यही बनायेंगे” –

जावेद जाफरी भाषणात म्हणाले.

- Advertisement -

त्यांच्या भाषणात ते पुढे हे देखील म्हणाले की CAA हे फार धोकादायक आहे आणि खूप जातीयवादी आहे. ज्यांनी संविधान बनवले, सरदार पटेल, गांधीजी, नेहरु, आंबेडकर यांच्या शिकवणींच्या विरोधात हा कायदा आहे असे देखील ते पुढे म्हणाले. जावेद जाफरी यांच्यासह फरहान अखतार, जिम सर्भ, अनुराग कश्यप, आयुष्मान खुर्राना, महेश भट, हुमा कुरेशी, सुहासिनी मुलाय, जावेद अख्तर, स्वरा भास्कर आणि शबाना आझमी या कलाकारांनी देखील नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात भाष्य केले आहे.


हेही वाचा: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आजच्या भाषणावर बॉलीवूडच्या दिग्दर्शकाचं ट्विट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -