घरदेश-विदेशउजवी विचारसरणीही नाही आणि डावी विचारसरणीही नाही, संघ केवळ राष्ट्रवादी - दत्तात्रेय...

उजवी विचारसरणीही नाही आणि डावी विचारसरणीही नाही, संघ केवळ राष्ट्रवादी – दत्तात्रेय होसबळे

Subscribe

नवी दिल्ली : उजवी विचारसरणीही नाही आणि डावी विचारसरणी देखील नाही, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) केवळ राष्ट्रहितासाठी काम करणारी संघटना आहे. आम्ही राष्ट्रवादी (Nationalist) आहोत. आज राष्ट्रजीवनाच्या केंद्रस्थानी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे. व्यक्तिमत्व विकास आणि समाज बांधणीचे काम संघ करत राहील, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे (Dattatreya Hosabale) यांनी सांगितले. जयपूर येथील बिर्ला सभागृहात बुधवारी ‘संघ काल, आज और उद्या’ या विषयावरील व्याख्यान कार्यक्रमात दत्तात्रेय होसबळे बोलत होते.

अस्पृश्यता हे पाप नसेल तर, जगात कोणतीही गोष्ट पाप नाही. अस्पृश्यता समाजव्यवस्थेतून हद्दपार करण्यासाठी संघाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे, असे सांगून दत्तात्रेय होसबळे म्हणाले की, साम्यवाद ते समाजवाद यासह सर्व कालखंडात आरएसएसची भूमिका महत्त्वाची होती. आरएसएसने सांस्कृतिक राष्ट्रवादावर भर दिला आहे. राष्ट्रीय संघ कठोर (rigid) नसून लवचिक (flexible) आहे. भारतातील धर्म आणि पंथ यांना एक मानतो. लोक आपल्या पंथाचे आचरण करता करता संघकार्य देखील करू शकतात, असे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

देशात लोकशाही प्रस्थापित करण्यात संघाचाही सहभाग आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महत्त्व समजण्यासाठी बुद्धी नव्हे तर, मनाची गरज आहे. केवळ बुद्धी असून चालणार नाही. कारण मन आणि बुद्धी घडवणे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम आहे, असे होसबळे म्हणाले. हे हिंदू राष्ट्र आहे, कारण हा देश बनवणारे देखील हिंदू आहेत. विविध लेखकांच्या पुस्तकांचा संदर्भ देत ते म्हणाले की, जे भारताला आपली पितृभूमी मानतात ते हिंदू आहेत. जो स्वतःला हिंदू समजतो तो हिंदू आहे.

संघाकडून एक लाख प्रकारची सेवा कार्ये चालतात. जनरेटर म्हणून संघ काम करते. ती एक जीवनपद्धती आहे. संघ ही एक कार्यपद्धती आणि जीवनशैली आहे. हिंदुत्वाच्या निरंतर विकासाच्या आविष्काराचे नाव संघ असल्याचे ते म्हणाले.

- Advertisement -

संविधान चांगले असेल आणि त्याची अंमलबजावणी करणारे वाईट असतील तर संविधानही काही करू शकत नाही, असे सांगून होसबळे म्हणाले की, पर्यावरण, जल, जंगल, जमीन यांचे रक्षण करून भारताच्या अस्मितेसाठी आणि अस्तित्वासाठी समाजाला सक्रिय व्हावे लागेल. वसुदैव कुटुंबकम ही केवळ घोषणाबाजीसाठी नाही. त्याची प्रयोगभूमी भारत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -