घरदेश-विदेशमोदींच्या नवा फोटो होतोय सोशल मीडियावर तुफान व्हायरल

मोदींच्या नवा फोटो होतोय सोशल मीडियावर तुफान व्हायरल

Subscribe

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचा पेहराव हा नेहमी चर्चेचा विषय असतो. मोदी कोणत्याही कार्यक्रमाची रुपरेषेप्रमाणे आपला पेहराव लुक बदलत असतात. मोदींच्या वेगवेगळ्या लूक्सला तुफान प्रतिसाद मिळतो. मोदींचे काही लुक हे अनेकांच्या फॅशनचा भाग झाला आहे. त्यातच आता पश्चिम बंगाल दौऱ्यातील त्याचा एक फोटो सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. या फोटोने सध्या सोशल मिडियावर जलवा केला आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त कोलकत्ता येथील एका कार्यक्रमात मोदी सहभागी झाले होते. त्यावेळी काढलेला हा एक फोटोने सोशल मिडिया गाजवत आहे. ( pm narendra modi hit on facebook and all social media)

Reached Kolkata to pay tributes to Netaji Bose.

Posted by Narendra Modi on Saturday, 23 January 2021

- Advertisement -

या फोटोला २४ तासातच फेसबुवर १० लाख लोकांनी लाइक केलं. मोदींनी हा फोटो शेअर करत लिहिले की, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी श्रद्धांजली वाहण्यासाठी कोलकत्त्यात आलो आहे. या फोटोला ४८ हजाराहून अधिक लोकांनी कमेंटस तर १५ हजाराहून अधिक लोकांनी शेयर केला आहे. सोशल मिडियावर सर्वाधिक फॉलोवर्स असलेल्या नेत्यांच्या यादीत मोदींचा सहभाग आहे. मोदी कार्यक्रमांचे, कौतुकाचे, उद्धाटनाचे अनेक फोटो सोशल मिडियावर शेअर करत असतात. तसेच लाईव्ह व्हिडिओच्या माध्यामातूनही ते सोशल मिडियावर सक्रिय असतात. त्यामुळे मोदींचे नवे फोटो सोशल मिडियावर आले रे आले की ते हिट ठरत असतात. मोदींनी हा नवा फोटोही कोलकत्ता पोहोचल्यानंतर पोस्ट केला होता. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी आणि केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने आयोजित केलेल्या कोलकात्यातील व्हिक्टोरिया मेमोरियलमध्ये कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ते गेले होते. त्यानंतर त्यांनी अनेक बंगाली चित्रपट कलाकारांसोबत चाय पे चर्चा केली होती. (Subhas Chandra Bose Birth Anniversary)

कोलकत्ता पोहचल्यानंतर मोदींनी प्रथम हा फोटो फेसबुकवर शेअर केला. ज्यात ते विमानातून बाहेर पडतांना दिसत आहे. त्यांनी साधा पांढऱ्या रंगाचा कुर्ता पायजमा आणि अंगावर शाल असा पोशाख परिधान केला होता. हा फोटो अनेकांना आपल्या वॉलवर शेअर केला असून मोदींच्या या लूकलाही चाहत्यांनी पसंती दर्शवली. या कार्यक्रमात मोदींनी भारताचे कोरोना विरोधातील लढाईतील योगदानाचे कौतुक केले. जगभरातील देशांना भारत लसाकरणाचा साठा पुरवत आहे हे पाहण्यासाठी नेताजी असते तर त्यांना नक्कीच अभिमान वाटला असता. आत्मनिर्भार भारत मोहिमेत देशातील प्रत्येकजण सहभागी झाले असून आता जगातील कोणतीच शक्ती भारताला आत्मनिर्भर होण्यापासून रोखू शकत नाही असे म्हटलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा- चीनने केला करार भंग;नियंत्रण रेषेवर लष्कर

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -