घरताज्या घडामोडीLIVE नवीन संसदेचा महासोहळा : नव्या संसदेतून पंतप्रधान मोदींची पहिले भाषण, या...

LIVE नवीन संसदेचा महासोहळा : नव्या संसदेतून पंतप्रधान मोदींची पहिले भाषण, या सुवर्णक्षणाच्या देशवासियांना शुभेच्छा

Subscribe

नवीन संसदेच्या उद्घाटन सोहळ्याला नवनिर्मित भवनात सुरु झाली आहे.

नवी दिल्ली –  नवीन संसदेच्या उद्घाटन सोहळ्याला नवनिर्मित भवनात सुरु झाली आहे. राष्ट्रगीताने संसद उद्घाटनाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे.

नवीन संसदेचा महासोहळा : नव्या संसदेतून पंतप्रधान मोदींची पहिले भाषण, महत्त्वाचे मुद्दे
– ही फक्त एक इमारत नाही. तर १४० कोटी भारतीय नागरिकांच्या इच्छा, आशा, अकांक्षांचा दृढसंकल्प आहे.
– २८ मे २०२३ रोजी या देशाला नवी भेट मिळाली आहे.
– हे नवीन भवन संकल्पातून सिद्धीकडे नेणारे असेल.
– हे नवीन भवन विकसित भारताचा संकल्प पूर्णत्वास गेलेले पाहाणार आहे.
– नव्या मार्गाने चालल्यानंतरच नवीन
– तामिळनाडूहून आलेल्या अधीनम यांनी आज मला सेंगोल सोपवले आहे. ते आज येथे स्थापित करण्यात आले आहे.
– या सेंगोलच्या मान-मर्यादाल त्याला पुन्हा देण्यात आली आहे.
– भारत फक्त लोकशाही राज्यव्यवस्थाच नाही तर मदर ऑफ डेमोक्रॅसी देखील आहे. लोकशाही हा संस्कार आणि विचार आहे.
– आमच्या वेद आणि महाभारतातून, वैशाली गणराज्यातून गण आणि गणतंत्राची संकल्पना समोर येते.
– आमचे संविधान हेच आमचा संकल्प आहे. आणि या संविधानाची प्रतिमा ही संसद आहे.
– गुलामी संपल्यानंतर भारताने खूपकाही गमावले होते. शेकडो वर्षांच्या गुलामीनंतर आम्ही आमचे अस्तित्वच विसरलो होतो.
– गुलामीतून आता आम्ही बाहेर येत आहोत.
– आज नव्या संसद भवनाला पाहून प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटत आहे.
– या भवनात कला आणि कौशल्य देखील आहे.
– यात संस्कृती आहे आणि संविधानाचे स्वर देखील आहेत.
– गेल्या ९ वर्षांचे आकलन केल्यास हे नऊ वर्ष हे नवनिर्माण आणि गरीब कल्याणाचे राहिले आहे.
– आज मला समाधान आहे की, संसदेची ही नवी इमारत उभी राहिली आहे, त्याच बरोबर गरीबांची ४ कोटी नवीन घरं तयार झाली आहे.
– गेल्या नऊ वर्षांत गावांना जोडणारे रस्ते तयार केले आहे.
– ३० हजार पंचायत भवन तयार करण्यात आले आहे. पंचायत भवनापासून संसद भवनापर्यंत गेल्या नऊ वर्षांत नवनर्माण केले गेले आहे.
– प्रत्येक देशाच्या इतिहासात एक अशी वेळ येते जेव्हा देशाची नवचेतना नव्याने जागृत होते.
– स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्याच्या २५वर्षांपूर्वी गांधीजींनी संपूर्ण देशाला एका सूत्रात बांधले आणि त्याचा परिणाम आम्हाला स्वातंत्र्य मिळण्यात झाला होता.
– स्वातंत्र्यांचा हा अमृतकाळही तोच क्षण आहे. पुढील २५ वर्षांत आम्हाला भारताला विकसीत राष्ट्र म्हणून जगासमोर घेऊन जायचे आहे.
– हे लक्ष्य कठीण आहे. मात्र यासाठी प्रत्येक देशवासियांनी प्रयत्न करण्याची गरज आहे.
– आता सर्व खासदारांची जबाबदारी आहे की, आम्ही १४० कोटी जनतेच्या संकल्पाला पुरेपूर खरे उतरू.
– भारताचं यश आगामी काळात अनेक देशांसाठी प्रेरणा देईल.

- Advertisement -

येथे पाहा पंतप्रधानांचे संपूर्ण भाषण

- Advertisement -

– गेल्या ९ वर्षांचे आकलन केल्यास हे नऊ वर्ष हे नवनिर्माण आणि गरीब कल्याणाचे राहिले आहे.
– आज मला समाधान आहे की, संसदेची ही नवी इमारत उभी राहिली आहे, त्याच बरोबर गरीबांची ४ कोटी नवीन घरं तयार झाली आहे.
– गेल्या नऊ वर्षांत गावांना जोडणारे रस्ते तयार केले आहे.
– ३० हजार पंचायत भवन तयार करण्यात आले आहे. पंचायत भवनापासून संसद भवनापर्यंत गेल्या नऊ वर्षांत नवनर्माण केले गेले आहे.
– प्रत्येक देशाच्या इतिहासात एक अशी वेळ येते जेव्हा देशाची नवचेतना नव्याने जागृत होते.
– स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्याच्या २५वर्षांपूर्वी गांधीजींनी संपूर्ण देशाला एका सूत्रात बांधले आणि त्याचा परिणाम आम्हाला स्वातंत्र्य मिळण्यात झाला होता.
– स्वातंत्र्यांचा हा अमृतकाळही तोच क्षण आहे. पुढील २५ वर्षांत आम्हाला भारताला विकसीत राष्ट्र म्हणून जगासमोर घेऊन जायचे आहे.
– हे लक्ष्य कठीण आहे. मात्र यासाठी प्रत्येक देशवासियांनी प्रयत्न करण्याची गरज आहे.

राष्ट्रगीताने संसद उद्घाटनाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे.

संसदेच्या निर्मितीसंबंधीच्या दोन माहितीपट दाखवण्यात आले. यात एक संसदेच्या निर्मितीसंबंधीचा तर दुसरा संसदेत मोदींनी स्थापित केलेल्या सेंगोलसंबंधीत आहे.
दरम्यान प्रमुख विरोधीपक्ष राहुल गांधी यांनी या संसद भवन उद्घाटनावर टीका करताना म्हटले आहे, की पंतप्रधान हे या नव्या संसद भवनाला राज्यभिषेकासारखं साजरं करत आहेत.

राज्यसभा उपसभापती हरिवंश यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांच्या शुभेच्छा संदेशाचे वाचन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन संसद भवनाचे रविवारी (२८ मे) सकाळी उद्घाटन केले. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यावेळी उपस्थित होते. पंतप्रधान मोदी सकाळी ७.३० वाजता संसद भवनात पोहचले. त्यांनी राष्ट्रपती महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास नमन केले, त्यानंतर होम-हवन पूजा केली.

तामिळनाडूहून आलेले अधीनम यांनी पंतप्रधान मोदींना सेंगोल सोपवला. यावेळी पंतप्रधानांनी सेंगोलला साष्टांग प्रणाम केला आणि त्यानंतर लोकसभा अध्यक्षांच्या आसना शेजारी स्थापित केले. या सोहळ्यात पंतप्रधानांनी संसदेच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका असलेल्या कामगारांचाही यावेळी सन्मान, सत्कार केला. यावेळी सर्वधर्म प्रार्थनेचेही आयोजन करण्यात आले होते.

यानंतर पंतप्रधानांनी ट्विट करुन म्हटले, आजचा दिवस हा सर्व देशवासियांसाठी अविस्मरणीय आहे. नवीन संसद भवन आपल्या सर्वांच्या आशा-अकांक्षा पूर्ण करणारे राहील.

राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या शुभेच्छा संदेशानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी उद्घाटन सोहळ्याला संबोधित केले.

हे नवीन संसद भवन आमची प्राचिन संस्कृती आणि आधुनिक विचार यांचा मिलाफ आहे, असे ओम बिर्ला म्हणाले. या भवनात देशातील प्रत्येक राज्यातील नागरिकांना त्यांचा सहभाग दिसेल, अशी या इमारतीची रचना करण्यात आल्याचे बिर्ला म्हणाले.
नव्या भवनात आपण सर्व साकारात्मक आणि विकासासाठीची चर्चा करु असा विश्वासही लोकसभा अध्यक्षांनी व्यक्त केला. त्यानंतर स्मारक पोस्ट तिकीटाचा अनावरण करण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -