घरताज्या घडामोडीनायजेरियात मुलींच्या शाळेवर दहशतवादी ह्ल्ला, ३०० हून अधिक विद्यार्थीनींचे अपहरण

नायजेरियात मुलींच्या शाळेवर दहशतवादी ह्ल्ला, ३०० हून अधिक विद्यार्थीनींचे अपहरण

Subscribe

नायजेरियामधील जाम्फ्रा येथील मुलींच्या शाळेवर दहशतवाद्यांनी हल्ला करत ३०० हून अधिक विद्यार्थीनींचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे

नायजेरियामधील जाम्फ्रा येथील मुलींच्या शाळेवर दहशतवाद्यांनी हल्ला करत ३०० हून अधिक विद्यार्थीनींचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शुक्रवारी सकाळी घडलेल्या या अपहरणनाट्यानंतर संपूर्ण नायजेरियात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच अपहरण झालेल्या विद्यार्थीनींना शोधण्याचे आदेश लष्कराला देण्यात आले आहे.

याप्रकरणी प्रत्यक्षदर्शी शिक्षिकेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोर मोटरसायकल आणि जीपमधून आले होते. त्यांनी सैनिकांचा पेहराव केला होता. शाळेत येताच त्यांनी बेछूट गोळीबार करण्यास सुरुवात केली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे एकच गोंधळ उडाला. त्याचवेळी हल्लेखोर वर्गात शिरले व त्यांनी विद्यार्थींनीना हाताला खेचून बाहेर काढले. नंतर त्यांना गाड्यांमध्ये कोंबण्यात आले. याप्रकारामुळे घाबरलेल्या मुलीं मदतीसाठी आरडाओरडा करु लागल्या तर काहीजणी रडू लागल्या. त्यावेळी हल्लेखोरांनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर या गाड्या एकामागोमाग एक निघून गेल्या. यावेळी हल्लेखोरांनी शिक्षकांनाही कोंडून ठेवले. शाळेवर दहशतवादी हल्ला व मुलींचे अपहरण झाल्याचे वृत्त कळताच पालकांनी शाळेकडे धाव घेतली.

- Advertisement -

दरम्यान, नायजेरिया व त्याच्या जवळपासच्या अनेक देशांमध्ये मुस्लीम दहशतवादी संघटना असलेल्या बोको हरामचा प्रभाव आहे. या संघटनेकडून अनेकवेळा नायजेरियातील वस्ती व शाळा, सरकारी कार्यालय यांच्यावर हल्ले करण्यात आले आहेत. गेल्यावर्षीही डिसेंबर महिन्यातही बोको हरामच्या दहशतवाद्यांनी नायजेरियातील कत्सिना राज्यातील एका बोर्डींग शाळेवर हल्ला केला होता. त्यावेळीही ३०० मुलांचे अपहरण करण्यात आले होते. नंतर लष्कराने या मुलांची दहशतवाद्यांच्या तावडीतून सुटका केली होती.

नायजेरियात बोको हरामची दहशत एवढी आहे की त्यांच्याविरोधात साक्ष देण्यास कोणीही पुढे येत नाही. शरिया कायदा माननारे सरकार प्रस्थापित करण्याच्या उ्द्देश्यानेच ही संघटना तयार करण्यात आली आहे. यामुळे शरियाविरोधात बोलणाऱ्या नागरिकांची य़ेथे कत्तल करण्यात येते. पोलिसही बोको हरामला दचकून असतात.

- Advertisement -

 

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -