घरदेश-विदेशSingapore summit: शिखर बैठकीत किम जोंग उन घेऊन आले स्वतःचे संडास

Singapore summit: शिखर बैठकीत किम जोंग उन घेऊन आले स्वतःचे संडास

Subscribe

अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेण्यासाठी सिंगापूर येथे आलेले उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी आपल्याबरोबर स्वतःचे संडास आणले आहे. किमच्या शरिराबाबत कोणतीही खाजगी माहिती इतर देशांना मिळूनये यासाठी किमने आपले संडास सिंगापूर येथे आणले आहे. यापूर्वीही दक्षिण कोरिया बरोबर झालेल्या बैठकीत किमने आपल्या बरोबर स्वतःचे संडास तेथे नेले होते. शिखर बैठकीदरम्यान किमवर कुठल्याही प्रकारचा हल्ला होऊ नये याची पुरेपूर काळजी घेतली जात आहे.

सुरक्षेबाबत किम सतर्क
डोनाल्ड ट्रम्प यांनी आज सकाळी किम जोंग यांची शिखर बैठकी दरम्यान भेट घेतली. उत्तर कोरियाने अण्वस्त्र नष्ट करावी हे या बैठकीचे मुख्य उदिष्ट आहे. या बैठकी दरम्यान किमची सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे. त्यांच्या सुरक्षेत कोणतीही कमी नको म्हणून कोरियन सुरक्षा रक्षकांची मोठी फौज सिंगापूर येथे आली आहे. किमच्या शौचद्वारे त्यांच्या डीएनए ची माहिती इतर देशांना मिळू नये म्हणून ही दक्षता घेतली जात आहे. किम कोणत्याही बैठकीत जातांना आपला पेन आणि पेन्सिल स्वतः बरोबर बाळगतात. आपले फिंगरप्रिंट कुठेही उमटू नयेत यासाठी ही काळजी घेतल्या जात असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

हस्तांदोलन करुन बैठकीस सुरुवात
भारतीय वेळे प्रमाणे आज सकाळी ६ वाजून ३० मिनीटांनी डोनाल्ड ट्रम्प – किम जोंग यांचे सिंगापूरमधील सेनटोसा आगमन झाले. दोन्ही नेत्यांनी हस्तांदोलन करुन या बैठकीची सुरुवात केली.

किम बद्दल जाणून घ्या याही गोष्टी

  • किम जोंग उन यांची जन्म तारीख कोणालाही माहित नाही.
  • किम यांच्या भूवया ह्या फोटोंमध्ये छोट्या होत जातात.
  • किम यांचे बालपण कोणालाही माहिती नसून ते एक गूढ आहे.
  • किम यांनी स्विझरलँड येथे आपले नाव बदलून शिक्षण घेतले.
  • किम सारखी हेअरकट त्यांच्या देशातील नागरिक ठेऊ शकत नाहीत.
  • किमने आपल्या देशातील नागरिकांसाठी सक्तिचे हेअरकट ठेवले आहेत.
  • किम यांना बास्केटबॉल खेळाची प्रचंड आवड आहे.
  • उत्तर कोरियातील नागरिकांना जिन्स घालण्यास बंदी आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -