घरताज्या घडामोडीजेएनयूमध्ये हल्ला करणारी ती मुलगी मी नाही - सांभवी झा

जेएनयूमध्ये हल्ला करणारी ती मुलगी मी नाही – सांभवी झा

Subscribe

डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांनी जवाहरलाल विद्यापीठावर हल्ला केला आहे, असा आरोप अभाविपची कार्यकर्ती सांभवी झाने केला.

रविवारी रात्री जवाहरलाल नेहरू विद्यापीठात काही बुरुखा घातलेल्या तरुणांनी हल्ला केला. या हल्लात अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. यासर्व घटनेच्या व्हिडिओ समोर आला. या व्हिडिओत बुरुखा घातलेल्यामध्ये एक निळ्या रंगाच्या चेक्स शर्ट मध्ये मुलगी दिसून आली. ती मुलगी अभाविपची कार्यकर्ती सांभवी झा असल्याचं म्हटलं गेलं. याचं पार्श्वभूमीवर सांभवी झाने असं म्हटलं की, ‘व्हिडिओतील मुलगी मी नाही.’ तसंच जवाहरलाल नेहरू विद्यापीठात पेरियार वसतिगृहामध्ये रविवारी डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांनी हल्ला केल्याचा आरोपी झाने केला.

सांभवी म्हणाली की, ‘व्हिडिओमध्ये रॉड घेऊन विद्यार्थ्यांना मारताना दिसत असलेली मुलगी मी ती नाही आहे. हे खरं आहे की मी त्याचं रंगाच चेक्स शर्ट घातलं आहे. परंतु व्हिडिओमधल्या मुलीत आणि माझ्यात खूप फरक आहे. माझ्या हातात कडा घातलेला आहे. तर व्हिडिओमधल्या मुलीने ते घातलेला नाही आहे.’

- Advertisement -

तसंच हल्लाबद्दल पुढे म्हणाली, ‘जेव्हा डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांनी आमच्यावर हल्ला केला तेव्हा मी अॅडमीन ब्लॉकमध्ये होते. त्यानंतर आम्ही पेरियार वसतिगृहाकडे निघालो. तिथे देखील डाव्या विचारसरणीच्या २५ ते ३० विद्यार्थ्यांनी आमच्यावर हल्ला केला. मी त्यामध्ये जखमी झाल्यामुळे एम्स ट्रामा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. या व्हिडिओ मधील मुलगी मी आहे असं लोक म्हणतं होते तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होते.’

- Advertisement -

हेही वाचा – #JNUattack Update : गेट वे ऑफ इंडियातील आंदोलनात रोहित पवार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -