घरताज्या घडामोडीरामायणातील धडे आता महाविद्यालयीन शिक्षणातही, खुद्द मुख्यमंत्र्यांनीच केली घोषणा

रामायणातील धडे आता महाविद्यालयीन शिक्षणातही, खुद्द मुख्यमंत्र्यांनीच केली घोषणा

Subscribe

मध्य प्रदेशातील कॉलेजमध्ये आता कला (Arts) विभागात पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना तत्वज्ञानाच्या (Philosophy)विषयात रामयणाचे धडे दिले जाणार आहेत. मध्य प्रदेशच्या उच्च शिक्षण विभागाने हे निश्चित केले आहे. सरकारने नुकत्याचे जारी केलेल्या अभ्यासक्रमानुसार, रामचरित मानसच्या व्यावहारिक ज्ञानाच्या नावाने संपूर्ण एक पेपर असेल, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना रामचरित मानससंबंधित आदर्शांचा अभ्यास करावा लागेल. या अभ्यासक्रमात वेद, उपनिषद आणि पुराणांत नमूद केलेले आदर्श आणि गुणांचे स्पष्टीकरण शिकवले जातील. तसेच रामायण आणि रामचरित मानसमधील फरक देखील सांगितला जाईल. भगवान श्री राम यांच्या पूर्वजांची भक्ती आणि त्यांचे इतर गुणे देखील संपूर्ण अभ्यासक्रमात तपशीलावर शिकवले जाईल.

मध्य प्रदेशचे उच्च शिक्षण मंत्री मोहन यादव म्हणाले की, ‘आपल्या गौरवशाली भूतकाळाचे ज्ञान मिळावे यासाठी हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आला आहे. या निर्णयासंबंधित कुणाचा आक्षेप नसावा, पण काही काँग्रेस आमदारांनी यावर आक्षेप घेतला आहे.’  भोपाळचे आमदार आरिफ मसून यांनी मागणी केली आहे की, ‘जर रामचरित मानस शिकवले जात असेल तर कुराणाचे देखील धडे दिले जावेत.’ येणाऱ्या दिवसांत मध्य प्रदेशचा हा निर्णय मोठा मुद्दा होईल आणि शिवराज सरकार चर्चेत येईल.

- Advertisement -

खासदार मोहन यादव म्हणाले की, ‘जो कोणी विद्यार्थी भगवान रामाचे चरित्र आणि त्यांच्या कार्याबद्दल जाणून घेऊ इच्छित आहे, तो या अभ्यासक्रमांद्वारे अभ्यास करू शकतो. आम्ही गझलच्या स्वरुपात उर्दू शिकवणार आहे. हा एक ऐच्छिक विषय असेल. विद्यार्थी आपल्या मर्जीनुसार याचा अभ्यास करू शकतात. यावर कोणाचाही आक्षेप नसावा.’


हेही वाचा – पीएम मोदींनी ७ वर्षात, तर सीएम योगींनी ४ वर्षात नाही घेतली एकही सुट्टी; यूपीच्या उपमुख्यमंत्र्यांचा दावा

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -