घरटेक-वेकआता Twitter ठेवणार 'ट्रोलर्स'वर नजर...

आता Twitter ठेवणार ‘ट्रोलर्स’वर नजर…

Subscribe

'hide reply' या फिचरची चाचणी अंतिम टप्प्यात आली असून, लवकरच ते सर्व युजर्ससाठी उपलब्ध होईल अशीही माहिती देण्यात येत आहे.

सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगला आळा घालण्यासाठी आता Twitter ने एक पाऊल पुढे टाकलं आहे. ट्विटर या मायक्रो ब्लॉगिंग साईटवर अनेक मोठ्या नेत्यांची, सेलिब्रिटीजची तसंच उद्योगपतींची अधिकृत अकाउंट्स आहेत. त्यामुळे या सोशल प्लॅटफॉर्मवर ट्रोलिंगची शक्यता कायमच अधिक असते. दरम्यान, याच गोष्टीला आळा घालण्यासाठी ट्वीटर लवकरच एक महत्वाचं फिचर लागू करणार आहे. ‘हाईड रिप्लाय’ असं या खास फिचरचं नाव असून सध्या ट्वीटरकडून या फिचरचं टेस्टिंग केल जात आहे. या फिचरमुळे

ट्विटरच्या सीनिअर प्रोडक्ट मॅनेजर मिशेल यासमिन हक यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘हाईड रिप्लाय’ app च्या मदतीने युजर्स त्यांच्या पोस्टवर आलेल्या रिप्लायला हाईड करु शकतील. याविषयी त्यांनी ट्वीटर तसंच ब्लॉगच्या माध्यमातून माहिती दिली आहे. या फिचरचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ‘आपल्याला कमेंट्सच्या माध्यमातून कुणी ट्रोल करत आहे’ असं एखाद्या युजरला वाटलं तर तो या ऑप्शनच्या माध्यमातून सदर व्यक्तीचा रिप्लाय वा कमेंट हाईड करु शकणार आहेत. ट्वीटर युजरच्या सुरक्षितेच्या दृष्टीने हे फिचर लवकरात लवकर लाँच होण्याची गरज आहे, असं मत व्यक्त केलं जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -