NTAकडून JEE सत्र 2 परीक्षेचा निकाल जाहीर; अमरावतीचा श्रेणिक साकला देशात अव्वल

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे यंदा झालेल्या JEE Mains सत्र 2 च्या परीक्षेत बसलेल्या उमेदवारांची प्रतीक्षा संपली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे.

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे यंदा झालेल्या JEE Mains सत्र 2 च्या परीक्षेत बसलेल्या उमेदवारांची प्रतीक्षा संपली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. यंदा 6 लाखांहून अधिक उमेदवारांनी परीक्षा दिली होती. या परीक्षेत देशभरातून 24 विद्यार्थी हे अव्वल आले आहेत. अमरावती येथील महर्षी पब्लिक स्कूलचा विद्यार्थी श्रेणिक साकला याने 100 टक्के गुण घेऊन देशात अव्वल आला आहे.

JEE Mains 2022 सत्र 2 ची परीक्षा 25 जुलै ते 30 जुलै दरम्यान घेण्यात आली होती.  या परीक्षेत देशातील 24 मुले ही अव्वल आली आहेत. नव्या ही राजस्थान येथील मुलगी देशातून दुसरी आली आहे. हरियनाच सार्थक माहेश्वरी हा तिसरा आला आहे.

उमेदवार जेईई मेन सत्र 2 चा निकाल अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर पाहू शकतात. नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE) मुख्य 2022 सत्र 2 साठी Answer Key आधीच जारी केली गेली आहे.

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने 3 ऑगस्ट रोजी JEE Mains सत्र 2 साठी पेपर 1, पेपर 2 A आणि पेपर 2 B साठी तात्पुरत्या Answer Key जारी केल्या होत्या. दरम्यान, JEE Mains 2022 सत्र 2 ची परीक्षा 25 जुलै ते 30 जुलै दरम्यान घेण्यात आली होती. याशिवाय, JEE Advanced 2022 साठी नोंदणी प्रक्रिया देखील सुरू झाली आहे.

JEE Mains सत्र 2 चा निकाल कसा पाहाल?

  • निकाल तपासण्यासाठी, उमेदवार प्रथम NTA च्या अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in.
  • ntaresults.nic.in ला भेट द्या.
  • उमेदवाराच्या मुख्यपृष्ठावर दिसणार्‍या JEE मुख्य सत्र 2 च्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
  • उमेदवार आवश्यक माहिती प्रविष्ट करा आणि लॉग इन करा.
  • उमेदवाराचे स्कोअरकार्ड स्क्रीनवर दिसेल.
  • आता उमेदवाराने स्कोअरकार्ड डाउनलोड करावे.
  • शेवटी, उमेदवारांनी स्कोअर कार्डाची प्रिंट आउट घ्यावी.

हेही वाचा –  टीईटी घोटाळा : अब्दुल सत्तारांच्या दोन्ही मुलींची प्रमाणपत्रं रद्द