घरताज्या घडामोडीभ्रष्टाचार कसा बुडाशी येतो, यावरही लेख लिहा; भाजपचा संजय राऊतांना सल्ला

भ्रष्टाचार कसा बुडाशी येतो, यावरही लेख लिहा; भाजपचा संजय राऊतांना सल्ला

Subscribe

शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे पत्राचाळ घोटाळाप्रकरणी ईडीच्या कोठडीत आहेत. आज त्यांची ईडी कोठडी संपणार असून त्यांना कोर्टात हजर केलं जाणार आहे. मात्र, त्यांनी ईडीच्या कोठडीतून शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये लेख लिहिला आहे. यावरून भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटकेत असलेले राऊत ईडी कोठडीतून लेख कसे काय लिहू शकतात?, असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला. मात्र, त्यानंतर भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करत संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.

भाजपचा संजय राऊतांना सल्ला

- Advertisement -

शिवसेना नेते संजय राऊत यांच्या आगाऊपणामुळे पक्ष संपला, पण यांचा आगाऊपणा मात्र संपत नाही. ईडीच्या कोठडीतून रोखठोक लिहिलंय. भ्रष्टाचार कसा बुडाशी येतो, असा एखादा लेख लिहा म्हणावं, असा सल्ला अतुल भातखळकर यांनी संजय राऊतांना दिला आहे.

- Advertisement -

गुजराती आणि राजस्थानींना हाकलून दिल्यास मुंबईत एकही पैसा शिल्लक राहणार नाही. तसेच यापुढे भारताची आर्थिक राजधानीही राहणार नाही, असं वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं होतं. त्यामुळे त्यांच्या या टिप्पणीबद्दल या कॉलममध्ये टीका करण्यात आली आहे. मात्र, राऊत ईडीच्या कोठडीत असून त्यांनी हा लेख कसा लिहिला?, कोणी लिहिला?, असे कोडे आता ईडीला पडले असून ईडी यासंदर्भात चौकशी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महाराष्ट्राच्या संतापाचा आगडोंब उसळला

राज्यपाल कोश्यारी यांनी महाराष्ट्राच्या जनतेची अखेर माफी मागितली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राबाबत चुकीची विधाने केल्याबद्दल पंडित नेहरू व मोरारजी देसाई यांनाही माफी मागावी लागली होती. नेहरू व मोरारजी देसाई यांनी इतिहासातील चुकीच्या संदर्भाचा आधार घेत विधाने केली. त्यामुळे महाराष्ट्राच्या संतापाचा आगडोंब उसळला. नेहरूंसारख्या लोकप्रिय नेत्यालाही महाराष्ट्राची माफी मागावी लागली, असं संजय राऊतांनी सामनाच्या रोखठोकमध्ये म्हटलंय.


हेही वाचा : ईडी कोठडीतून राऊतांनी लेख कसा लिहिला?, मनसेचा ‘रोखठोक’


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -