घरदेश-विदेशओला निघाली 'इंग्लंड'ला!

ओला निघाली ‘इंग्लंड’ला!

Subscribe

रिक्षा, टॅक्सीला हात दाखवून त्यांना इच्छित स्थळी जाण्याची विनवणी न करता फोन वरुन एका क्लिकवर टॅक्सी मिळवून देण्याची सुविधा 'ओला' या कंपनीने २०१० साली सुरु केली.

एका क्लिकवर टॅक्सी सर्व्हिस देणारी ‘ओला’ ला इंग्लडचे तिकीट मिळाले आहे. त्यामुळे लवकरच ही सुविधा युनायटेड किंग्डम म्हणजेच इंग्लडमध्ये सुरु होणार आहे. ओलाला स्पर्धा देणारी उबर टॅक्सी सेवा आधीच इंग्लडमध्ये सुरु आहे. आणि आता ओला ही या पाठोपाठ इंग्लडवारीसाठी निघाल्यामुळे आता या दोघांमध्ये तिथेही स्पर्धा रंगणार का ?असा प्रश्न निर्माण झाला आहे.

उबर पाठोपाठ ओला

इंग्लंडमध्ये ओलाची प्रतिस्पर्धी असलेली उबर ही कंपनी टॅक्सी पुरवते. पण त्यांच्या सेवेबदद्ल असलेली वाईट मते जगजाहिर असल्याचे ओला कंपनीच्या सीईओ भावीश अग्रवाल यांनी सांगितले. उबरची सेवा अधिक चांगली करण्यासाठी उबरचे नवे सीईओ यांनी कंबर कसली असली तरी ओलाच्या उत्तम सेवेमुळेच ही सेवा इंग्लडला सुरु करणार असल्याचे अग्रवाल म्हणाले. सध्या ओला या ठिकाणी सुरु झाली नसली तर पुढील एका महिन्यात मँचेस्टर आणि साऊथ वॉल्स या ठिकाणी ही सुविधा सुरु होईल अशी माहिती देण्यात आली आहे. या ठिकाणी टॅक्सीना परवाने देण्याचे काम सुरु आहे. लवकरच ते पूर्ण होईल असे देखील अग्रवाल यांनी सांगितले.

- Advertisement -

अन्य टॅक्सी पुरवणाऱ्या कंपनींची टक्कर

जगभरात वेगवेगळ्या कंपनी टॅक्सी पुरविण्याचे काम करतात. या आधी ओला आणि उबरला चीनच्या DIDI या टॅक्सी सेवेने टक्कर दिली होती. त्यामुळे आता या ओला आणि उबरला वेगवेगळ्या टॅक्सी कंपन्यांसोबतच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी चांगली सेवा द्यावी लागणार हे मात्र नक्की!

अशी झाली ओलाची सुरुवात?

रिक्षा, टॅक्सीला हात दाखवून त्यांना इच्छित स्थळी जाण्याची विनवणी न करता फोन वरुन एका क्लिकवर टॅक्सी मिळवून देण्याची सुविधा ‘ओला’ या कंपनीने २०१० साली सुरु केली. देशातील ११० शहरांमध्ये टप्प्या टप्प्याने ही सेवा सुरु झाली. ज्यामुळे अनेक टॅक्सी, रिक्षा चालकांना फायदा झाला आणि प्रवाशांची देखील प्रवासादरम्यान टॅक्सी, रिक्षा शोधण्याची डोकेदुखी कमी झाली. गेल्याचवर्षी ओलाची हिच सेवा ऑस्ट्रेलियामधील ७ शहरांमध्ये सुरु झाली आणि आता इंग्लंडला ही सेवा सुरु होणार असून या पुढे युरोपात ही सेवा वाढवण्याचा कंपनीचा मानस आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -