घरताज्या घडामोडीOmicron Variant: दक्षिण आफ्रिकेतून कर्नाटकात आलेले १० प्रवासी बेपत्ता, राज्य सरकार...

Omicron Variant: दक्षिण आफ्रिकेतून कर्नाटकात आलेले १० प्रवासी बेपत्ता, राज्य सरकार हाय अलर्टवर

Subscribe

हे आफ्रिकी नागरिक १२ ते २२ नोव्हेंबर दरम्यान बंगळूरूला पोहचले होते

कर्नाटकमध्ये दक्षिण आफ्रिकेतून आलेला ओमिक्रॉनचा ६६ वर्षीय नागरिक आढळल्यानंतर सर्वांचीच झोप उडाली मात्र हा नागरिकाने एका खासगी लॅबमधून स्वत:चे निगेटिव्ह रिपोर्ट्स दाखवून दुबईला पळून गेल्याचे समोर आले आहे. त्यातच आता दक्षिण आफ्रिकेतून कर्नाटकात आलेले आणखी १० प्रवासी देखील बेपत्ता असल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार हे आफ्रिकी नागरिक १२ ते २२ नोव्हेंबर दरम्यान बंगळूरूला पोहचले होते. हे प्रवासी कसे काय पळून गेले असा प्रश्न सर्वांना पडला आहे. कर्नाटकचे आरोग्यमंत्री के. सुधारक यांनी एका रात्रीत या प्रवाशांना शोधून काढण्याचे आदेश दिले आहेत.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात ओमिक्रॉनचे रुग्ण आढल्याने राज्याला हाय अलर्ट जारी करण्यात आला होता. पॉझिटिव्ह रुग्णांना तपासणी सुरू होती मात्र बेपत्ता झाले आहेत. अधिकाऱ्यांनी संपूर्ण विमानतळाची पाहणी केली मात्र प्रवासी सापडले नाही. त्यांचे फोन देखील स्वीच ऑफ लागत आहेत. त्यामुळे या प्रवाशांना सध्या बेपत्ता म्हणून घोषित करण्यात आले आहेत. या प्रकरणानंतर कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली. बेपत्ता असलेले १० लोक लवकरात लवकर सापडला हवेत आणि त्यांची कोरोना टेस्ट व्हायला हवी त्याचप्रमाणे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याशिवाय एकही प्रवासी विमानतळाच्या बाहेर जाता कामा नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

या प्रकरणाच्या चौकशीनंतर मुख्य आयुक्त गौरव गुप्ता यांनी म्हटले आहे की, या प्रकरणात कोणतीही सरळ माहिती हाती लागलेली नाही. प्रवाशांचे ट्रेसिंग करणे ही एक प्रक्रिया आहे ट्रेसिंग करुनही प्रवाशी नाही मिळाले तर या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी काही प्रोटोकॉल्स आहेत. त्यामुळे या परिस्थितीशी दोन हात करण्याची तयारी आहे.


हेही वाचा – Omicron-ओमीक्रॉन सर्वांना मारून टाकणार ! चिठ्ठी लिहीत डॉक्टरने केली पत्नीसह दोन मुलांची हत्या

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -