घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रचेटकिणीला हवाय नकट्या नाकाचा अन पांढऱ्या केसांचा चेटका

चेटकिणीला हवाय नकट्या नाकाचा अन पांढऱ्या केसांचा चेटका

Subscribe

बालकुमार मेळाव्यात चिमुकल्यांची चेटकिणीसोबत धम्माल, मस्ती

साहित्य संमेलनात पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या बालकुमार मेळाव्यात चेटकिणीने मुले आणि मुलींसोबत धम्माल आणि मस्ती केली. चेटकिणीने मुलांना वेताळाच्या गोष्टी सांगितल्या. त्यास चिमुकल्यांनी दिलखुलास दाद दिली. शिवाय, चेटकिणीसोबत फोटो काढले. तिला नकट्या नाकाचा आणि तोही पांढऱ्या केसांचा चेटका  साहित्य संमेलनात आणि ऑनलाईन  शोधण्यास मदत करू असे सांगितले.
साहित्य संमेलनात बालकुमार मेळाव्यात ज्येष्ठ अभिनेत दिलीप प्रभावळकर यांनी चिमुक्ल्यांशी संवाद साधल्यानंतर चेटकिणीने चिमुकल्यांसोबत वेताळबाबाच्या गोष्टी अभिनय स्वरूपात सांगत धम्माल केली. यावेळी चिमुकल्यांनी रेकॉर्डब्रेक गर्दी केली होती. अंजना भंडारी यांनी  चेटकिणीचाअभिनय साकारला. तर चिमुककल्यांच्या वतीने मुग्धा थोरात हिने चेटकिणला प्रश्न विचारले.

असा झाला चेटकिणीसोबत संवाद

प्रश्न : नारळाच्या झाड्याला आंबे का येत नाहीत?
उत्तर : आंब्याचे बी नाहीत ते खाली आहे.
प्रश्न : कोलगेटच्या गेटमधून कोणी पास का होत नाही?
उत्तर : ब्रशला खूप पेस्ट असल्याने बाहेर जाता येत नाही. नुसता फेस होऊन घसरगुंडी होते..
प्रश्न : चेटकीण शाळेत गेली होती का ?
उत्तर : रात्रीची १२ वाजता चिंचेच्या झाडावर वेताळमामा शिकवायला यायचा.
प्रश्न : शाळेत विषय कोणते होते
उत्तर : गरम रक्त प्यायचे. लोक सरळ बघतात म्हणून मुडके उलटे ललटकवतो.
प्रश्न : लग्न झाले आहे का
उत्तर : लग्न करायचा विचार केला आहे. चेटका नकट्या नाकाचा व पांढरे पांढरे केस असलेला हवाय. रात्री फिरणारा हवाय. लग्नासाठी साहित्य संमेलनानिमित्त सोशल मीडियावर खाते  उघडत आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -