घरताज्या घडामोडीOmicron Variant : ओमिक्रॉन व्हेरियंटचे दोन भागात विभाजन, तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

Omicron Variant : ओमिक्रॉन व्हेरियंटचे दोन भागात विभाजन, तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

Subscribe

कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरियंटने दक्षिण आफ्रिकेत थैमान घातलं आहे. WHOने ओमिक्रॉनचा समावेश व्हेरियंट ऑफ कन्सर्नमध्ये केला आहे. त्यामुळे व्हेरियंटबाबत ही माहिती चिंता वाढवणारी आहे. ओमिक्रॉनचे नव्या लिनिएज BA.2 चे अनेक रूग्ण हे दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडामध्ये सापडले आहेत. ओमिक्रॉनचा नवा प्रकार असल्यामुळे हा व्हेरियंट शोधून तज्ज्ञांच्या मते खूप कठीण आहे.

ओमिक्रॉनचा पहिला व्हेरियंट ८ नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेत सापडला होता. यामध्ये ५० हून अधिक म्युटेशन आहेत. परंतु ओमिक्रॉनच्या व्हेरियंटमध्ये झालेले विभाजन हा शास्त्रज्ञांसाठी खूप औत्सुक्याचा ठरलाय. असं तज्ज्ञांचं मत आहे. कारण तो या साथीमागच्या विज्ञानाला चांगल्या पद्धतीने समजण्यासाठी मदत करेल. त्यामुळे सर्व सामान्यांना चिंतींत राहण्याची गरज नाहीये.

- Advertisement -

डेल्टा व्हेरियंट(B.1617.2) दोन आणि तीन व्हेरियंटमध्ये याआधाही विभाजीत झाला होता. त्यामुळे डेल्टा प्लसचा सुद्धा यामध्ये समावेश आहे. परंतु १०० व्हेरियंटमध्ये तो विभाजीत झाला होता. मात्र त्यामुळे मोठी हानी झाली नाही. ओमिक्रॉन हा व्हेरियंट वेगळा झाल्याने दिल्लीतल इन्स्टिट्यूट ऑफ जिनोमिक्स अँड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजीच्या वरिष्ठ शास्त्रज्ञांनीही ट्विट केले आहे. B.1.1.529 चा व्हेरियंट आता BA.1 आणि BA.2 मध्ये विभाजित झाला आहे. तसेच या दोन्ही व्हेरियंटमध्ये एकूण २४ म्युटेशनचा समावेश आहे.

ओमिक्रॉनच्या या व्हेरियंटला त्यांच्या म्युटेशनच्या आधारावर वेगळे करण्यात आले आहे. यामधील काही म्युटेशनमध्ये दोन्ही व्हेरियंट सामान्य आहेत. मात्र काही म्युटेशन दोन्ही व्हेरियंटमध्ये वेगवेगळे आहेत. परंतु धक्कादायक बाब म्हणजे BA.1 व्हेरियंटमध्ये एस-जीन दिसून येत नाही.

- Advertisement -

हेही वाचा : Ashish shelar vs kishori pednekar : शेलार महिलांविरोधात अपशब्द वापरूच शकत नाहीत, देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -