घरताज्या घडामोडीOmicron-कोरोना महामारीच्या अंताचे संकेत , दोन महिन्यात येणार 'अच्छे दिन'

Omicron-कोरोना महामारीच्या अंताचे संकेत , दोन महिन्यात येणार ‘अच्छे दिन’

Subscribe

डेन्मार्क आरोग्य संघटनेचे प्रमुख टायरा ग्रूव क्रॉस यांनी लवकरच अच्छे दिन येणार असल्याचे संकेत दिले आहेत.

दक्षिण अफ्रीकेत आढळलेल्या ओमीक्रॉन वेरियंटने जगभरात धूमाकूळ घातला आहे. ओमीक्रॉन घातक नसला तरी त्याचा संसर्ग वेग अधिक असल्याने अनेक देशांमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. यामुळे भारतासह काही देशांमध्ये कोरोनाची तिसरी लाट आल्याचे जाहीर करण्यात आले आहे. याचदरम्यान, डेन्मार्क आरोग्य संघटनेचे प्रमुख टायरा ग्रूव क्रॉस यांनी लवकरच अच्छे दिन येणार असल्याचे संकेत दिले असून येत्या दोन महिन्यात ओमीक्रॉन वेरियंटबरोबरच कोरोनाचाही अंत होणार असून सर्वसामान्यांचे जीवन पूर्वपदावर येणार असल्याचा दावा केला आहे.

एका वृत्तवाहीनीला दिलेल्या मुलाखतीत डेन्मार्क स्टेट सीरम इन्स्टीट्यूटच्या अॅपिडेमायोलॉजिस्ट टायरा यांनी ओमीक्रॉन हा डेल्टापेक्षा कमी घातक असल्याचे संशोधनातून स्पष्ट झाल्याचे सांगितले. तसेच डेल्टाची लागण झालेल्या रुग्णाला रुग्णालयात दाखल करावे लागते. पण तसे ओमीक्रॉन झालेल्या रुग्णाबाबत होताना दिसत नाही.

- Advertisement -

ओमीक्रॉनचे रुग्ण घरातच उपचार घेऊन पाच सहा दिवसात बरे होतात. यामुळे येत्या दोन महिन्यात कोरोना महामारीपासून कायमची सुटका होईल असा दावा त्यांनी केला. तसेच फेब्रुवारीमध्ये ओमीक्रॉनचा मोठा विस्फोट होईल पण नंतर मात्र हळूहळू रुग्णसंख्या कमी होत कोरोना फक्त नावापुरता राहील असेही टायरा यांनी म्हटले आहे.

 

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -