घरताज्या घडामोडीनिवडणूकजीवी केंद्र सरकार देशातील रोजगाराचा प्रश्न सोडवण्यात अपयशी, राष्ट्रवादीचा भाजपवर निशाणा

निवडणूकजीवी केंद्र सरकार देशातील रोजगाराचा प्रश्न सोडवण्यात अपयशी, राष्ट्रवादीचा भाजपवर निशाणा

Subscribe

देशातील बेरोजगारीचा दर वाढला आहे. आकडेवारीनुसार, शहरांमधील बेरोजगारीचा दर डिसेंबरमध्ये 9.30 टक्के होता, जो नोव्हेंबर 2021 मध्ये 8.21 टक्के होता.

देशातील कोरोना संकटामुळे सर्वसामान्य नगारिकांवर आर्थिक संकट आलं आहे. पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे लॉकडाऊन आणि निर्बंध करण्यात येत आहे. त्यामुळे जनता आर्थिक संकटात येण्याची शक्यता आहे. अशामध्ये देशात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली असल्याचा अहवाल समोर आला आहे. देशात बेरोजगारी मागील 4 महिन्यांपेक्षा वाढली आहे. केंद्र सरकार आगामी निवडणुकांमध्ये व्यस्त असून तरुणांच्या रोजगाराविषयीचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरले असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने केंद्र सरकारवर तरुणांच्या रोजगाराच्या प्रश्नावरुन हल्लाबोल केला आहे. एकीकडे कोरोना संकटामुळे ढासळलेली अर्थव्यवस्था आणि केंद्राची फारशी अनुकूल नसलेली अर्थधोरणे यामुळे देशातील तरुणांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. बेरोजगारीच्या दराने चार महिन्यातील उच्चांक गाठला असून देशातील तरूण पिढीला बेरोजगारीची सर्वाधिक झळ सोसावी लागत आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकोनॉमी (सीएमआईई) या संस्थेने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार डिसेंबर महिन्यात बेरोजगारीचा दर वाढून 7.9 टक्के एवढा झाला आहे. ऑगस्ट 2021 मध्येही बेरोजगारीचा दर हा 8.3 टक्क्यांवर पोहचला होता. त्यानंतरचा हा सर्वात उच्चांकी दर आहे.

- Advertisement -

देशात बेरोजगारी वाढत असताना केंद्रातील सत्ताधारी भाजप मात्र विविध राज्यातील निवडणुकांच्या तयारीला लागले आहे. हे निवडणूकजीवी सरकार देशातील तरुणांचा रोजगाराचा प्रश्न सोडवण्यात मात्र अपयशी ठरल्याचे चित्र असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. देशातील ५ राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहे. या निवडणुकांच्या प्रचारामध्ये केंद्रातील सरकार व्यस्त असल्यामुळे नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले असल्याची टीका राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे.

- Advertisement -

देशातील बेरोजगारीचा दर वाढला आहे. आकडेवारीनुसार, शहरांमधील बेरोजगारीचा दर डिसेंबरमध्ये 9.30 टक्के होता, जो नोव्हेंबर 2021 मध्ये 8.21 टक्के होता. तर ग्रामीण भागातील बेरोजगारीचा दर हा डिसेंबरमध्ये 7.28 टक्के होता जो मागील महिन्यात 6.44 टक्क्यांवर आला होता.


हेही वाचा : Omicron नंतर कोरोनाचा IHU वेरियंट आला समोर, 46 वेळा झालाय म्युटेट

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -