घरताज्या घडामोडीवर्कींग वुमनसाठी फिटनेस फंडा

वर्कींग वुमनसाठी फिटनेस फंडा

Subscribe

ज्या कामावर जाणाऱ्या महिल्या असतात त्या काही वेळा आपले डाएट प्लॅन टाळतात, असे करणे खूप चुकीचे असते. कितीही व्यस्त असो सर्वात महत्त्वाचे काम खाणे आहे, असा विचार करून चाला. काहीही खाण्यापेक्षा बॅलेंस डाएट करा, ज्यामध्ये प्रोट्रीन, व्हिटॅमिन्स, मिनरल्स, फायबर सामिल असतात. हे तुमच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे असते. खाण्यामध्ये फॅट आणि कार्बोहायड्रेटची मात्रा कमी ठेवा. चहा, कॉफी आणि इतर पेयापेक्षा (ड्रिंक्स) फळांचा ज्यूस पिणे आरोग्यासाठी खूप चांगले असते. तसेच मीठ आणि साखर कमीत कमी खा.

दररोज सकाळी उठल्यानंतर काही वेळ योग्य व्यायामासाठी काढा. मेडिटेशनला तुमच्या फिटनेसचा भाग बनवा. कारण हा तुम्हाला तणावमुक्त ठेवतो. डान्स, रनिंग (धावणे), मॉर्निंग वॉक अशा प्रकारच्या गोष्टीकरून स्वतःला निरोगी आणि फिट ठेवण्याचा प्रयत्न करा. ऑफिसमध्ये लिफ्ट ऐवजी पायऱ्याचा वापर करा.

- Advertisement -

मौसम कोणताही असो पाणी पिणे कमी करू नका. दिवसभरात कमीत कमी १० ते १२ ग्लास पाणी प्या. पाणी कमी प्यायल्यामुळे शरीरात अनेक प्रकारच्या समस्या सुरू होतात. टरबूज, गाजरमध्ये पाण्याची क्षमता जास्त असते. त्यामुळे हे सेवन करा. पाणी एकत्र जास्त पिण्यापेक्षा थोडे-थोडे प्या.

ऑफिसमध्ये वेफर्स, बिस्किट, कुकीज इत्यादीपासून दूर राहा. जर शरीराला आवश्यकतेपेक्षा जास्त पोषण मिळाले नाही तर तुम्ही इमोशनल इटिंगचा शिकार होऊ शकता. त्यामुळे वेळेत जेवा.

- Advertisement -

फिट राहण्यासाठी ऑफिसच्या कामानंतर स्वतःसाठी वेळ काढा. तुम्हाला आवडेल ते करा. त्यामुळे तुम्ही आनंदी राहाला आणि तुमचा मूड फ्रेश राहिल. यामुळे नवीन आणि चांगले विचार करण्यास तुम्हाला मदत होईल.


हेही वाचा – Skin Care Tips : हिवाळ्यात कच्चे दूध वापरा अन् मिळवा तजेलदार चेहरा


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -