घरताज्या घडामोडीबांगलादेशमध्ये नदीत उलटली बोट; 23 जणांचा मृत्यू, अनेक बेपत्ता

बांगलादेशमध्ये नदीत उलटली बोट; 23 जणांचा मृत्यू, अनेक बेपत्ता

Subscribe

बांगलादेशमध्ये नदीत बोट उलटून 23 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी बोट उलटल्याची ही धक्कादायक घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, डझनहून अधिक लोक बेपत्ता झाल्याची माहिती समोर येत आहे.

बांगलादेशमध्ये नदीत बोट उलटून 23 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी बोट उलटल्याची ही धक्कादायक घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, डझनहून अधिक लोक बेपत्ता झाल्याची माहिती समोर येत आहे. (other major accident in Bangladesh 23 killed as boat capsizes in river)

या घटनेची माहिती पोलिसांनी रविवारी दिली. या घटनेची माहिती देताना उत्तर पंचगढचे जिल्हा प्रशासक झहरुल इस्लाम यांनी सांगितले की, ज्या ठिकाणी हा अपघात झाला त्या मृतदेहांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. बेपत्ता लोकांसाठी बचावकार्य सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

“त्यांना बेपत्ता लोकांची नेमकी संख्या माहित नाही, परंतु प्रवाशांनी सांगितले की बोटीवर 70 हून अधिक लोक होते”, असेही इस्लामने सांगितले.

बांगलादेशमध्ये दरवर्षी शेकडो लोक बोट अपघातात मरण पावतात. हा एक सखल देश आहे, ज्याकडे विस्तृत अंतर्देशीय जलमार्ग आहेत. परंतु सुरक्षा यंत्रणेचा अभाव आहे. याआधी मे महिन्यात, गर्दीने भरलेली स्पीडबोट वाळूने भरलेल्या बल्क कॅरिअरला धडकून पद्मा नदीत बुडाल्याने किमान 26 जणांचा मृत्यू झाला होता.

- Advertisement -

हेही वाचा – मध्य प्रदेशात शिक्षकाने भर वर्गात उतरवला आदिवासी मुलीच्या अंगावरील घाणेरडा गणवेश

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -