घरताज्या घडामोडीमध्य प्रदेशात शिक्षकाने भर वर्गात उतरवला आदिवासी मुलीच्या अंगावरील घाणेरडा गणवेश

मध्य प्रदेशात शिक्षकाने भर वर्गात उतरवला आदिवासी मुलीच्या अंगावरील घाणेरडा गणवेश

Subscribe

एका शिक्षकाने भर वर्गात 10 वर्षीय आदिवासी मुलीच्या अंगावरील घाणेरडा गणवेश उतरवल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशात घडली आहे.

एका शिक्षकाने भर वर्गात 10 वर्षीय आदिवासी मुलीच्या अंगावरील घाणेरडा गणवेश उतरवल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशात घडली आहे. गणवेश उतरवल्यानंतर इतर विद्यार्थिनींसमोर तिला तासंतास उभे ठेवले. याप्रकरणी संबंधित शाळेतील शिक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. दरम्यना, या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश प्रशासनाने दिल्याचे समजते. (teacher suspended for asking tribal girl to take off her dirty uniform in madhya pradesh)

शहडोल जिल्ह्यातील जयसिंगनगर ब्लॉक, बारा टोला, सरकारी प्राथमिक शाळा, पौडी येथे शुक्रवारी ही घटना घडल्याची माहिती मिळते. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये इयत्ता 5वीमधील एक विद्यार्थिनी फक्त तिचा गणवेश काढून केवळ अंतर्वस्त्रावर उभी असल्याचे दिसत आहे. तसेच, शिक्षक कुमार त्रिपाठी तिचा गणवेश धुताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये आणखी काही विद्यार्थिनीही मुलीजवळ उभ्या असलेल्या दिसत आहेत.

- Advertisement -

नेमकं प्रकरण काय?

आदिवासी मुलीचा गणवेश घाणेरडा झाला असल्याने शिक्षक कुमार त्रिपाटी यांनी तिला गणवेश काढण्यास सांगितले. त्यानंतर तिचा गणवेश तिच्यासमोर धुतला आणि सुकत घातला. गणवेश सुकत नाही तोपर्यंत तिला जवळपास 2 तास शाळेच्या आवारात त्याच अवस्थेत उभे ठेवले. गणवेश सुकल्यानंतर मुलीला तो परिधान करून वर्गात शिकायला पाठवले.

- Advertisement -

या प्रकरणी काही गावकऱ्यांनी शिक्षक कुमार त्रिपाटी यांच्याविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. मुलीचा गणवेश धुतल्याने तो सुखेपर्यंत म्हणजेच जवळपास 2 तास शाळेच्या आवारात त्याच अवस्थेत मुलीला उभे राहावे लागल्याचा दावा गावकऱ्यांनी केला. मिळालेल्या माहितीनुसार, शिक्षक त्रिपाठी यांनी स्वत:ला ‘स्वच्छता मित्र’ असे सांगून अधोवस्त्र परिधान केलेल्या आदिवासी मुलीसोबतचा फोटो काढून विभागाच्या सोशल मीडिया ग्रुपवर शेअर केला. ही बाब गावकऱ्यांना समजताच त्यांनी शाळेच्या मुख्याध्यापकांसमोर याबाबत नाराजी व्यक्त करत आरोपी शिक्षकावर कारवाईची मागणी केली. त्याचबरोबर आदिवासी कार्य विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी शिक्षक त्रिपाठी यांना निलंबित केले आहे.


हेही वाचा – काँग्रेस अध्यक्षपदासाठी शशी थरुरही निवडणूक लढवणार, अशोक गहलोत यांच्यासोबत टफ फाइट?

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -