सावधान! चीन आणि पाकिस्तान एकाचवेळी भारतावर हल्ला करण्याच्या तयारीत!

चीनला मदत करण्यासाठी म्हणून पाकिस्तानच्या आयएसआयकडून काश्मीर खोऱ्यात दहशतवादी कारवायांना आणखी खतपाणी घातले जाण्याची शक्यता आहे.

china - pakistan

गलवान खोऱ्यात भारत- चीन दरम्यान सुरू असलेला संघर्ष कमी करण्यासाठी भारताकडून प्रयत्न केले जात आहेत. चीनशी चर्चाकरून हा प्रश्न सोडवला जात आहे. त्याचबरोबर भारत देश एकीकडे कोरोनासारख्या महामारीशी लढत आहे. तर दुसरीकडे चीन आणि आता पाकिस्तानने गिलगिट-बालटिस्तान या भागात आपले सैन्य तैनात केलं आहे.

इंडिया टूडेने दिलेल्या माहितीनुसार, लडाखच्या उत्तरेला गिलगिट बल्टिस्तान भागात पाकिस्तानने २० हजार अतिरिक्त सैनिक पाठवले आहेत. भारताची कोंडी करण्यासाठी पाकिस्तानने हे सैन्य पाठवले आहे. हल्ला करण्याची संधी पाकिस्तान शोधत आहे असे सूत्रांनी सांगितले.

सध्या भारतीय लष्करी अधिकारी आणि गुप्तचर यंत्रणांमध्ये बैठकांचे सत्र सुरु आहे. चीन आणि पाकिस्तानकडून असलेल्या धोका लक्षात घेऊन या बैठकीत चर्चा सुरू आहे. चीनला मदत करण्यासाठी म्हणून पाकिस्तानच्या आयएसआयकडून काश्मीर खोऱ्यात दहशतवादी कारवायांना आणखी खतपाणी घातले जाण्याची शक्यता आहे.

काश्मिरमध्येही दहशतवादी हल्ले सुरूच

गेले काही दिवस काश्मीरमध्ये सातत्याने दहशतवादी हल्ले होत आहेत. आत्तापर्यंत १२० दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. काश्मीरमध्ये पाकिस्तान दहशतवाद्यांकरवी सुरक्षा दलांवर सुद्धा हल्ले घडवून आणू शकतो. भारत आणि चीनच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांमध्ये काल चुशुल येथे तब्बल दहा तास बैठक चालली. यामध्ये पूर्व लडाखमध्ये तणाव कसा कमी करायचा, यावर प्रामुख्याने चर्चा झाली.

पाकिस्तान म्हणतं भारत जबाबदार

दोन दिवसांपूर्वी कराची स्टॉक एक्सजेंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यासाठी पाकिस्तान भारताला जबाबदार ठरवण्याचा प्रयत्न करत आहे. पण पाकिस्तानचा हा आरोप संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील अन्य देशांना मान्य नाहीय. त्यामुळेच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून या हल्ल्यासंबंधी अजून कुठलेही वक्तव्य समोर आलेले नाही.


हे ही वाचा – महिलेसमोर अश्लील चाळे करणारा इन्स्पेक्टर फरार; २५ हजारचं बक्षीस