घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटकोरोनामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान अडचणीत; पुन्हा लष्कराकडे सत्ता?

कोरोनामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान अडचणीत; पुन्हा लष्कराकडे सत्ता?

Subscribe

कोरोना व्हायरसच्या संकटाशी सामना करण्यात इम्रान खान अपयशी ठरलच्या ठपका ठेवला जात आहे.

जगभरातील इतर देशांप्रमाणे पाकिस्तान देखील कोरोनाच्या विळख्यात अडकला आहे. यामुळे पंतप्रधान इम्रान खान यांची खुर्ची खिळखिळी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इम्रान खान यांना पदावरून दूर करुन पुन्हा एकदा लष्कराच्या ताब्यात सत्ता देण्याच्या हालचाली सुरु झाल्या असल्याची चर्चा पाकिस्तानी माध्यमात रंगू लागली आहे. जानकारांच्या मतानुसार, इम्रान खान यांनी लॉकडाऊन जाहीर करण्यास उशीर केल्यामुळे पाकिस्तानमधील परिस्थिती बिघडली. तसेच कोरोनाच्या संकटाशी दोन हात करताना सरकार असमर्थ दिसत असल्यामुळे सैन्याला उतरावे लागले आहे. पाकिस्तानच्या जनतेला आता पंतप्रधान इम्रान खान यांच्यापेक्षा सैन्यावर अधिक विश्वास वाटत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

मार्च महिन्यात २२ मार्च रोजी जेव्हा भारतात जनता कर्फ्यू लावण्यात आला होता. त्याचदिवशी इम्रान खान यांनी पाकिस्तानमध्ये लॉकडाऊनचा विरोध केला होता. लॉकडाऊन केल्यामुळे लाखो मजूरांना बेरोजगारीला सामोरे जावे लागू शकते, असा त्यांचा युक्तिवाद होता. मात्र इम्रान खान यांनी हे वक्तव्य केल्यानंतर २४ तासातच सैन्याने लॉकडाऊन घोषित केला. तसेच देशातील अनेक भागांमध्ये सैन्याची तुकडी बंदोबस्तासाठी लावली. सैन्याने बंदोबस्त लावल्यानंतर राष्ट्रीय कोअर कमिटी स्थापन करुन सर्व राज्यांशी सरळ संपर्क साधायला सुरुवात केली.

- Advertisement -

पाकिस्तानमधील फायनान्शियल टाइम्सच्या एका माजी प्रतिनिधीने सांगितले की, कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यात इम्रान खान सपशेल अपयशी ठरले आहेत. दिवसागणिक रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सैन्याला पाचारण करावे लागले आहे. लष्कराने अशाप्रकारे कमान सांभाळणे म्हणजेच इम्रान खान यांना उतरती कळा लागली असल्याचे बोलले जात आहे.

माजी क्रिकेटर ते राजकारणी असा प्रवास केलेल्या इम्रान खान यांचे हे पहिले अपयश नाही. पाकिस्तानमध्ये सत्ता मिळवण्यासाठी काश्मिरचा मुद्दा चघळला जातो. मात्र इम्रान खान काश्मिरच्या मुद्द्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर मुत्सद्देगिरी दाखविण्यात कमी पडलेले दिसतात. आता FATF (Financial Action Task Force)च्या काळ्या यादीतून पाकिस्तानला बाहेर काढण्यात देखील इम्रान खान यशस्वी होतात का? ते पहावे लागणार आहे. पीपीपी पक्षाचे खासदार नफीस शाह यांनी सांगितले की, जर इम्रान खान यांना निर्णय घेता येत नसतील तर त्यांना बाजूला सारून दुसरा त्यांची जागा घेईल.

- Advertisement -

पाकिस्तानमध्ये सध्या कोरोनाचे १४ हजार रुग्ण आहेत. तर ३०१ लोकांचा मृत्यू झाला आहे. विश्लेषकांचे असे मत आहे की, पाकिस्तानमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या यापेक्षा अधिक आहे. मात्र चाचणी करण्यासाठी साधनसामुग्रीची कमतरता असल्यामुळे रुग्णांची खरी संख्या कळत नाहीये. इम्रान खान यांनी कोरोनाच्या मुकाबल्यासाठी चीनकडून बरीच आशा बाळगली होती. मात्र चीनने पाकिस्तानची निराशा केली. चीनने पाकिस्तानला दिलेले मास्क हे अंडरगारमेंट्स पासून तयार केले होते, अशी बातमी आल्यानंतर इम्रान खान यांचा बराच तीळपापड झाला होता. आज पाकिस्तानमध्ये कोरोनााबाधितांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडे पीपीई किट नाहीत. त्यामुळे अनेक ठिकाणी डॉक्टरांनी धरणे आंदोलन केले होते. तसेच आतापर्यंत १६० डॉक्टरांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

याच संकटात पाकिस्तानची अर्थव्यवस्था देखील डळमळीत झालेली आहे. आयएमएफने तर पाकिस्तानचा जीडीपी १.५ टक्के राहणार असे सांगितले आहे. इम्रान खान इतर देशांकडून मदत मागत आहेत. मात्र त्यांना कुणीही मदत करायला तयार नाही. परिणामी इम्रान लष्करासमोर शरणागती पत्करतील, अशी अटकळ बांधण्यात येत आहे. पाकिस्तानी सरकारने आता व्यावसायिक आणि कट्टरपंथियांवर नियंत्रण मिळवण्यासाठी लष्काराला सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -