घरCORONA UPDATECoronavirus : 'हे' प्रश्न घेऊन नागरिक साधतात ज्योतिषांशी संपर्क

Coronavirus : ‘हे’ प्रश्न घेऊन नागरिक साधतात ज्योतिषांशी संपर्क

Subscribe

नागरिक कोरोनामुळे प्रचंड चिंतेत असून त्यांनी आता ज्योतिषांशी संपर्क करुन आपल्या प्रश्नांचे निरसन केले आहे.

देशात कोरोनाचा विळखा अधिकच घट्ट होताना दिसत आहे. सध्याची परिस्थिती पाहता नागरिकांमध्ये भविष्याची चिंता देखील वाढली आहे. दरम्यान, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने देश २१ दिवस लॉकडाऊन केला आहे. मात्र, या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेवर खोलवर परिणाम होत असून देशाची अर्थव्यवस्था संकटात आली आहे. तसेच उद्योगधंदे बंद असल्याने कंपन्या पगार कपातीबरोबरच कर्मचारी कपात करण्याच्या विचारात आहेत. अशावेळी घरखर्च कसा चालवायचा? या प्रश्नांनी देशातील अनेक जण ग्रासले आहेत. त्यामुळे वैज्ञानिकांकडून येणाऱ्या प्रत्येक घडामोडींवर नागरिकांचे लक्ष आहे. मात्र, त्यासोबतच आता नागरिकांनी ज्योतिषांचा सल्ला घेण्यास सुरुवात केली आहे. काही जण फोनकॉल्स करुन तर काही जण ऑनलाईन आपले प्रश्न ज्योतिषांना विचारत असल्याचे समोर आले आहे.

कोरोना संकटामुळे उद्भवलेल्या सद्य परिस्थितीमुळे लोकांना भविष्याबद्दल भीती वाटायला लागली आहे. आर्थिक संकट आणि आरोग्य यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त भारतातील १० प्रसिद्ध भाषांमध्ये चालणारी ऐस्ट्रोवेबसाइट गणेशा स्पीक्स.कॉम (GaneshaSpeaks.com) या वेबसाइटचे पदाधिकारी धर्मेश जी जोशी यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना विषाणू येण्यापूर्वी अनेक नागरिक आपल्या कुटुंबातील काही समस्या, रिलेशनशीप, लग्न, लव मॅरेज, मुलं, करिअर आणि जॉब याविषयीचे प्रश्न घेऊन येत होते. मात्र, सध्या लोकांना कोरोनाबाबतीत अनेक प्रश्न पडले आहेत.

- Advertisement -

नागरिकांची याबाबत चिंता वाढली

सध्या नागरिक वैयक्तिक जीवनाविषयी प्रश्न न विचारता देश आणि जगाकडून या कोरोना विषाणूची सुटका कधी होणार? कोरोनाचा धोका कधी दूर होईल? अर्थव्यवस्था कधी रुळावर येईल? हा विषाणू पुन्हा येणार नाही ना?, असे एकना अनेक प्रश्न नागरिकांकडून ज्योतिषांना विचारले जात आहेत. त्यामुळे या संकटामुळे नागरिकांचे प्रश्न देखील बदले आहेत. विशेष म्हणजे भारताच्या बाहेर राहणारे अनेक जण त्यांचे आई – वडिल सुरक्षित राहणार ना?, असे देखील प्रश्न विचारत आहेत.

नागरिकांना हे प्रश्न सतावत

हिंदी आणि भारतातील बर्‍याच भाषांमध्ये चालणारी एस्ट्रोसेज.कॉम (astrosage.com) वेबसाइट अतिशय लोकप्रिय असून या वेबसाईडचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पुनीत पांडे यांनीही कोरोना संकटामुळे प्रश्नांची संख्या वाढल्याची कबुली दिली आहे. ते म्हणतात की, ‘नागरिकांच्या प्रश्नांमध्ये ३० – ३५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे नागरिकांना कोरोनाच्या संकटामुळे अनेक प्रश्न पडले आहेत. तसेच त्यांची अर्थव्यवस्था पुढे कशी जाईल? हे त्यांना जाणून घ्यायचे आहे. वरवर पाहता, नोकरीला जाण्याची भीती आणि पगाराची चिंता यासह अनेक प्रश्न नागरिकांना सतावत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – लॉकडाऊनमध्ये श्रीमंताचा हॉटेलमध्ये हैदोस; सेक्स रॅकेटचा पर्दाफाश


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -