घरदेश-विदेशParamjit Singh Panjwad : कुख्यात खलिस्तानी दहशतवाद्याची पाकिस्तानमध्ये हत्या

Paramjit Singh Panjwad : कुख्यात खलिस्तानी दहशतवाद्याची पाकिस्तानमध्ये हत्या

Subscribe

नवी दिल्ली : भारतातून पळून गेलेल्या कुख्यात खलिस्तानी दहशतवादी (Notorious Khalistani terrorists) परमजीत सिंग पंजवाड (Paramjit Singh Panjwad) याची पाकिस्तानमध्ये हत्या करण्यात आली आहे. दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी परमजीतच्या घरात घुसून त्याची गोळ्या मारून हत्या केली आहे.

परमजीत सिंग पंजवाड हा खलिस्तान कमांडो फोर्सचा म्होरक्या होता. त्याने १९९० मध्ये तो भारतातून पळ काढत पाकिस्तानमध्ये आश्रय घेतला होता. यावेळी तो लाहोरमध्ये अनेक ठिकाणी मलिक सरदार सिंग असे नाव वापरून राहत होता आणि पाकिस्तानामधून भारताविरोधी दहशतवादी कारवाया सुरू ठेवल्या होत्या. तो सध्या लाहोरच्या जोहर शहरातील सनफ्लॉवर सोसायटीमध्ये वास्तव्यास होता आणि त्याच्यावर दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी घरात घुसून त्याच्यावर गोळीबार केल्याचं समोर आले असून या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी सहा वाजता दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्याच्या सोसायटीत प्रवेश केला आणि पंजवाड याच्यावर हल्ला करून घटनास्थळावरून पळ काढला.

- Advertisement -

हेही वाचा – J&K : बारामुल्ला येथील चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश

1999 मध्ये चंदीगडमध्ये बॉम्ब स्फोट घडवला
30 जून 1999 रोजी परमजीत सिंग पंजवाडने चंदीगडमधील पासपोर्ट कार्यालयाजवळ बॉम्ब स्फोट घडवू आणला होता.  एका स्कूटरमध्ये बॉम्ब लपवून ठेवण्यात आला होता असे पोलिसांकडून सांगण्यात आले होते. या बॉम्ब स्फोटात चार जण जखमी झाले होते, तर अनेक गाड्यांचे नुकसान झाले होते. पोलिसांनी तपास करताना पानिपतमधून स्कूटरच्या मालकाला अटक करून चौकशी सुरू केली होती.

- Advertisement -

दहशतवाद्यांच्या यादीत पंडवाडचे नाव
परमजीत सिंग पंजवाड हा पंजाबमधील तरनतारन जिल्ह्यातील झब्बल गावचा रहिवासी होता. तो पूर्वी पंजाबमधील सोहल येथील बँकेत काम करत होता. मात्र त्यानंतर तो पंजाबमध्ये दहशतवाद्यांच्या संपर्कात आला आणि त्याने स्वतःची दहशतवादी संघटना खलिस्तान कमांडो फोर्सची स्थापना केली. भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने २०२० मध्ये  9 दहशतवाद्यांची यादी जाहीर केली होती. या यादीत पंजवाडचं नाव होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -