J&K : बारामुल्ला येथील चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश

जम्मू-कश्मीर येथील बारामुल्लाच्या करहामा कुंजर भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. एकीकडे बारामुल्ला येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे तर, दुसरीकडे राजोरीच्या कांडी जंगलातही चकमक सुरू असल्याची माहिती मिळते.

जम्मू-कश्मीर येथील बारामुल्लाच्या करहामा कुंजर भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. एकीकडे बारामुल्ला येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे तर, दुसरीकडे राजोरीच्या कांडी जंगलातही चकमक सुरू असल्याची माहिती मिळते. शुक्रवारी राजौरीच्या कांडी जंगलात झालेल्या या दहशतवादी हल्ल्यात सुरक्षा दलाचे ५ जवान शहीद झाले होते. त्यानंतर आता एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. (Jammu Kashmir Encounter Security Forces Terrorists One Terrorist Killed J&K Baramulla)

मिळालेल्या माहितीनुसार, बारामुल्ला येथील करहामा कुंजर भागात सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला आहे. सध्या सुरक्षा दलाकडून इतर दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू आहे. याबाबत काश्मीर पोलिसांनी माहिती दिली आहे.

एकीकडे बारामुल्ला येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे तर, दुसरीकडे राजोरीच्या कांडी जंगलातही चकमक सुरू असल्याची माहिती मिळते. राजौरी सेक्टरमध्ये बनयारी पर्वतीय क्षेत्रातील कांडी जंगल परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली. सकाळी 7.30च्या सुमारास जवानांनी या परिसरात ऑपरेशन सुरू केले. यावेळी दहशतवाद्यांबरोबर जोरदार चकमक झाली. त्यावेळी सुरक्षा दलाने त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. चकमकीवेळी दहशतवाद्यांनी आयईडी बॉम्बस्पह्ट केला. त्यात पाच जवान शहीद झाले. एक मेजर गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर उधमपूर येथील लष्करी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, राजोरीच्या कांडी जंगलात केलेल्या हल्ल्याची पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट या दहशतवादी संघटनेने पाच जवानांच्या हौतात्म्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

20 एप्रिलला झाला होता भीषण हल्ला

गेल्या महिन्यात 20 एप्रिल रोजी राजौरी सेक्टरमध्येच भीमबीरगली आणि पुंछदरम्यान जवानांना घेऊन जाणाऱया लष्कराच्या ट्रकवर दहशतवाद्यांनी भीषण ग्रेनेड हल्ला केला. त्यात ट्रकने पेट घेतला. यामध्ये पाच जवान शहीद झाले होते. 25 दिवसांनंतर पुन्हा जम्मू-कश्मीरात दहशतवादी हल्ला झाला आहे.


हेही वाचा – Russian Diplomat Punch Video: Ukraine चा झेंडा खेचला; रशियन नेत्याला युक्रेनच्या खासदाराने केली मारहाण, व्हिडिओ व्हायरल