आर्थिक मंदीच्या काळात ‘या’ ठिकाणी ‘पार्ले-जी’चे उत्पादन २० ते २५ टक्क्यांनी वाढले!

आर्थिक संकटादरम्यान पार्ले-जीची विक्री आणि कंपनीचे उत्पादन वाढले

पार्ले बिस्कीट

कोरोना संक्रमणामुळे दीर्घकाळ लॉकडाऊनचा परिणाम कंपन्यांच्या उत्पादन क्षमता आणि विक्रीवर झाला आहे. लहान मोठे उद्योग बंद होण्याच्या मार्गावर आहेत. परंतु, या आर्थिक संकटादरम्यान पार्ले-जीची विक्री आणि कंपनीचे उत्पादन वाढले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनमध्ये एकट्या प्रयागराजच्या औद्योगिक क्षेत्रात पार्ले-जी बिस्किटांचे उत्पादन २० ते २५ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. तर मनुष्यबळ आणि कच्च्या मालाच्या अभावामुळे फ्रँचायझी कंपनीला वर्क ऑर्डर पूर्ण करण्यात खूप अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे सांगितले जात आहे.


लॉकडाऊनमध्ये ‘पार्ले-जी’ची रेकॉर्ड ब्रेक विक्री; ८२ वर्षांचा विक्रम मोडला!

सर्वात जुनी आणि सर्वात मोठी बिस्किट उत्पादन करणारी कंपनीचे देशभरात सुमारे १०५ उत्पादन युनिट्स आहेत, जी फ्रँचायझी आधारित आहेत. नैनीच्या औद्योगिक क्षेत्रात तिरुपती बेकर्स प्रायव्हेट लिमिटेडने पार्ले-जीचा फ्रेंचाइजी घेतली आहे. त्याचे डायरेक्टर संजय रतनानी आणि जनसंपर्क अधिकारी श्याम सिंह आहेत. येथे सामान्य दिवसांमध्ये यांत्रिकी कार्मचाऱ्यांसह साधारण २०० लोक काम करतात. तेथील दररोजची उत्पादन क्षमता साधारण १४० टन असते, परंतु सध्या दररोज सरासरी ४० ते ४५ टन उत्पादन होते.

लॉकडाऊनमध्ये उत्पादन ५५ ते ६० टन वाढले

लॉकडाऊनमध्ये हे उत्पादन दररोज ५५ ते ६० टन पर्यंत वाढले. यानंतर, अनलॉक १ सुरू झाल्याबरोबर उत्पादन आणखी वाढले. याचे कारण म्हणजे हे बिस्किट प्रत्येक विभागात पोहोचल्याचे सांगितले जात आहे. लॉकडाऊन दरम्यान, गरजूंमध्ये त्याचे वितरण देखील उत्पादन वाढविण्यात उपयुक्त ठरले आहे.

पार्ले-जीचा एकूण व्यवसाय वाढला आहे. सुरूवातीच्या टप्प्यात कच्चा माल आणि मनुष्यबळाच्या अभावामुळे आम्हाला बर्‍याच अडचणी आल्यात. परंतु नंतर परिस्थिती हळूहळू सावरली. दिवस-रात्र काम करून आम्ही येथे १५ ते २० टक्के उत्पादन वाढविले आहे. जे सामान्य दिवसांपेक्षा जास्त असल्याचे औद्योगिक क्षेत्र, नैनी, प्रयागराज येथील तिरुपती बेकर्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक संजय रतनानी यांनी सांगितले आहे.