Paytm IPO listing: Paytm च्या MahaIPO मधून गुंतवणूकदारांची निराशा, जाणून घ्या शेअर्स लिस्ट

Paytm IPO listing paytm ipo share listing stock listed with discount
Paytm IPO listing : Paytm च्या MahaIPO मधून गुंतवणूकदारांची निराशा, जाणून घ्या शेअर्स लिस्ट

फिनटेक क्षेत्रातील देशातील आघाडीची पेटीएम कंपनीचा आज MahaIPO जाहीर झाला. मात्र या MahaIPO ने
पेटीएममध्ये मोठ्या अपेक्षेने पैसे गुंतवू पाहणाऱ्या गुंतवणूकदाऱ्यांच्या पदरी निराशा पाडली आहे. देशातील सर्वात मोठ्या डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म पेटीएमची मूळ कंपनी One 97 Communications चे आज शेअर बाजारात लिस्टिंग झाले. या कंपनीचे शेअर्स सवलतीसह बाजारात लिस्ट झाले. हे शेअर्स बीएसईवर (BSE) १९५५ रुपयांच्या म्हणजेच ९.०७ टक्के सवलतीसह लिस्ट झाले. त्याची इश्यू प्राईस २१५० रुपये इतकी होती.

म्हणजेच एका शेअर्समागे गुंतवणूकदाराला १९५ रुपयांचा तोटा झाला. एनएसईवर( NSE) हेच शेअर्स ९.३ टक्क्यांच्या सवलतीसह १९५० रुपयांवर लिस्ट झाले. सुरुवातीला बाजारात याच शेअर्सची किंमत २०० टक्क्यांहून अधिक घसरून १,६५७ रुपयांवर आली होती. मात्र पेटीएमच्या या तोट्यातील शेअर्समुळे गुंतवणूकदार फार निराश झाले आहे. सध्या सोशल मीडियावर मीम्सचा महापूर आला आहे. पेटीएमचे शेअर्स घेण्यापासून दूर राहिलेले गुंतवणूकदार मात्र यातून आनंद घेत आहेत. यावर्षी शेअर्स बाजारात लिस्ट झालेली ही ४९ वी कंपनी आहे. Paytm चा हा IPO हा देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा IPO होता. १८, ३०० कोटी रुपयांच्या या IPO ला मात्र अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्याला एकूण १.८९ पट बोली मिळाली. हा आयपीओ ८ नोव्हेंबर रोजी सुरु झाला ते १० नोव्हेंबर रोजी बंद झाला. याला QIB कॅटेगरीमध्ये २.७९ पट आणि रिटेल इनवेस्टर्स कॅटेगरीमध्ये १.६६ पट बोली लागली.

ग्रे मार्केट प्रीमियम

अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद न मिळाल्याने या शेअर्सच्या ग्रे मार्केट प्रीमियममध्ये सातत्याने घसरण पाहायला मिळत होती. कंपनीचा ग्रे मार्केट प्रीमियम नुकताच लिस्ट झालेल्या आयपीओ शेअर्सपेक्षा सर्वात कमी चालत होता. त्यामुळे पेटीएमचा स्टॉक ५ ते १० टक्के सवलतीने लिस्ट होऊ शकतो. अस मत तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. लिस्टिंगच्या आधी ग्रे मार्केटमध्ये पेटीएमचे शेअर्स २,१५० रुपयांच्या इश्यू प्राइसने ३० रुपये म्हणजे १.४ टक्के प्रीमियमने ट्रेंड करत होते.

मात्र ग्रे मार्केटमध्ये त्यांच्या किमतीत सातत्याने घसरण होत राहिली. ७ नोव्हेंबरला हा शेअर ग्रे मार्केटमध्ये २३०० रुपये प्रति शेअरने ट्रेड करत होता. याची इश्यू प्राईस १५० रुपये म्हणजे ७ टक्के अधिक होती. मात्र १० नोव्हेंबरपर्यंत हाच शेअर ४० रुपयांवर पोहचला. तर लिस्टिंगपूर्वी ग्रे मार्केटमध्ये कंपनीचा अनलिस्टेड शेअरचे प्रीमियम केवळ ३० रुपये किमतीने चालत होते. पेटीएमच्या सतत कमी होणाऱ्या लिस्टिंगमुळे सोशल मीडियावर मिम्सचा महापूर आला आहे.