घरदेश-विदेशRSS नेत्याच्या हत्येप्रकरणी PFI नेता अबू बकरला अटक

RSS नेत्याच्या हत्येप्रकरणी PFI नेता अबू बकरला अटक

Subscribe

केरळमधील आरएसएस नेते श्रीनिवासन यांच्या हत्येचा तपास पोलिसांनी गतिमान केला असून याप्रकरणी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा नेता अबू बकर सिद्दीक याला अटक केली आहे. या वर्षी एप्रिलमध्ये पलक्कडमध्ये RSS नेते श्रीनिवासन यांची दुचाकीस्वारांनी हत्या केली होती.

राजकारण्यांच्या हत्येसाठी याद्या तयार केल्याचा आरोप –

- Advertisement -

पीएफआयचे नेते अबू बकर सिद्दीक यांच्यावर त्यांच्या सहकाऱ्यांसह नेत्यांना लक्ष्य करणाऱ्यांची यादी तयार केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अबू बकर त्याच्या साथीदारांसह राजकारण्यांना लक्ष्य करण्यासाठी एक यादी तयार करत होता.

आरएसएस नेत्याची तलवारीने वार करून केली हत्या –

- Advertisement -

या वर्षी 16 एप्रिल रोजी केरळमधील पलक्कड येथे RSS नेते श्रीनिवासन यांची हत्या करण्यात आली होती. 3 दुचाकीस्वारांनी श्रीनिवासन यांच्या दुकानात घुसून त्यांच्यावर तलवारीने हल्ला केला आणि नंतर दुचाकीवरून पळ काढला.

भाजपने पीएफआयचा हातअसल्याच केला आरोप –

भाजपने श्रीनिवासन यांच्या हत्येत पीएफआयचा हात असल्याचे सांगितले होते. भाजपचे सरचिटणीस आणि पलक्कडचे नेते सी कृष्ण कुमार यांनी या हल्ल्यामागे पीएफआयचा हात असल्याचे म्हटले होते. त्यावेळी आरोप केला होता की पोलिस आरएसएस कार्यकर्त्याची हत्या थांबवू शकत नाहीत कारण शस्त्रे घेऊन जाणाऱ्या टोळ्या शहरात मुक्तपणे फिरत आहेत.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -