घरCORONA UPDATEPfizer, AstraZeneca लसीच्या अँटीबॉडीज तीन महिन्यात होतायत कमी, लॅन्सेट रिपोर्ट

Pfizer, AstraZeneca लसीच्या अँटीबॉडीज तीन महिन्यात होतायत कमी, लॅन्सेट रिपोर्ट

Subscribe

Pfizer आणि AstraZeneca लस घेतलेल्या लोकांच्या शरीरातील अँटीबॉडीजचे प्रमाण सहा आठवड्यांनंतर कमी होत असल्याचे दिसत आहे, तर दहा आठवड्यांनंतर या लसींच्या अँटीबॉडीजमध्ये तब्बल ५० टक्क्यांनी घसरण झाल्य़ाची माहिती लॅन्सेट जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अभ्यासानुसार या लसींचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तींच्या शरीरातील अँटीबॉडीजचे प्रमाण सहा आठवड्यांनी कमी होण्यास सुरुवात होत आहे.

युकेमधील युनिर्व्हसिटी कॉलेज लंडन ( UCL)च्या अभ्यासकांनी असे नमूद केले की, जर अँटीबॉडीजचे प्रमाण अशाप्रकारे कमी होत गेल्यास कोरोनाच्या नव्या व्हेरियंटविरोधात लसीची परिणामकारकताही कमी होईल, पण असे कधी होईल याचा अंदाज बांधलेला नाही.

- Advertisement -

युसीएच्या अभ्यासानुसार, कोव्हिशील्ड आणि फायझर लसींची तुलना केली असता कोव्हिशील्ड लसींचे दोन्ही डोस घेणाऱ्यांपेक्षा फायझर लसींचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तींमध्ये चांगल्या, प्रभावी अँटीबॉडीज तयार होत आहेत. तसेच लसीकरण पूर्ण झालेल्या नागरिकांमध्ये कोरोनामुक्त नागरिकांपेक्षा अधिक अँटीबॉडीज तयार होत आहे.

कोव्हिशील्डवर फायझर पडतेय भारी

युसीएलच्या मधुमिता श्रोती यांनी सांगितले की, कोव्हिशील्ड आणि फायझर लसींचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तींच्या शरीरात सुरुवातीला सर्वाधिक अँटीबॉडीज आढळून आल्या आहेत. त्यामुळे कोरोना संसर्गापासून या व्यक्तींचे चांगले संरक्षण करता येत आहे. असे असले तरी दोन ते तीन महिन्यांनी अँटीबॉडीजच्या प्रमाणात लक्षणीय घट होत असल्याचे आढळून आले. असेही त्या म्हणाल्या,

- Advertisement -

या अभ्यासात १८ आणि त्यावरील वयोगटातील तब्बल ६०० व्यक्तीवर संशोधन करण्यात आले. यादरम्यान अभ्यासकांनी अँटीबॉडीजच्या स्तरात घसरण होत असल्यासंदर्भात वैद्यकीय परिणाम काय आहेत हे अजून स्पष्ट झालेले नाही. मात्र अँटीबॉडीजमध्ये काही प्रमाणात घट होणे स्वाभाविक असल्याचे म्हटले आहे.

कोविशिल्ड, फायझर लसींमुळे अँटीबॉडीजमध्ये होतेयं घसरण

फायझर लसीच्या अँटीबॉडीज प्रमाण २१ ते ४१ दिवसात ७५०६ युनिट पर मिलीलिटरवरून ७० आणि त्यापेक्षा जास्त दिवसांनी ३३२० युनिट पर मिलीलिटरपर्यंत घसरत आहे. तर कोविशिल्ड लसीच्या अँटीबॉडीज प्रमाणात ० ते २० दिवसात १२०१ युनिट प्रति मिलीलिटर इतका असतो. तो ७० ते त्यापेक्षा जास्त दिवसांनी १९० युनिट प्रति मिलीलिटरपर्यंत खाली येत आहे.

यावर युसीएलमधील प्रोफेसर रॉब अलड्रेज सांगतात, ‘ कोणत्या व्यक्तीला बुस्टर डोस देण्यासाठी गरज आहे याचा विचार करत होतो. त्यावेळी आमच्या डाटानुसार ज्यांना सर्वात लवकर लस देण्यात आलेल्या आणि आधीच गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या किंवा ७० पेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना बुस्टर डोस देण्यास प्राथमिकता देण्याचा सल्ला अभ्यासकांनी दिला आहे. विशेष करुन कोविशिल्ड लस घेतलेल्या व्यक्तींमध्ये अँटीबॉडीजचे प्रमाण सर्वात कमी होत असल्याचे आढळले आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -