farm laws: गुरु पर्व का तोहफा ! कृषी कायदे रद्द करण्यासाठी मोदींनी निवडला गुरुनानक जयंतीचा दिवस

pm modi announced farm laws withdrawn decision on occasion of guru nanak jayanti
farm laws: गुरु पर्व का तोहफा ! कृषी कायदे रद्द करण्यासाठी मोदींनी निवडला गुरुनानक जयंतीचा दिवस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना देशातील तीन वादग्रस्त कृषी कायदे रद्द करत असल्याची घोषणा केली आहे. मागील ११ महिन्यांपासून कृषी कायद्यांविरोधात देशातील शेतकरी दिल्लीच्या सीमेवर कडाक्याच्या थंडीत आणि पावसामध्येही ठाण मांडून होते या शेतकऱ्यांचा हा विजय आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाचे देशभरातून स्वागत होत आहे. तसेच मोदींनी हा निर्णय घेण्यासाठी गुरुनानक जयंतीचा दिवस निवडला आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी हा निर्णय गुरु पर्व का तोहफा असल्याचे सांगत मोदींचे आभार मानले आहेत.

केंद्रातील मोदी सरकारने ११ महिन्यांपूर्वी देशात ३ कृषी कायदे लागू केले होते. या कृषी कायद्याचा देशातील शेतकऱ्यांनी विरोध केला होता. पंजाब, हरियाणा या उत्तरेकडील राज्यातील शेतकऱ्यांनी कृषी कायद्याविरोधात आंदोलन सुरु केले होते. हे आंदोलन तब्बल ११ महिन्यापासून अजूनही सुरु आहे. आंदोलनात आतापर्यंत ५०० ते ७०० शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. शेतकरी आपल्या भूमिकेवर ठाम असल्यामुळे मोदी सरकारला झुकावे लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली आहे. तसेच देशातील शेतकऱ्यांना समजवण्यात अपयश आले असल्याचेही मोदींनी म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय गुरु नानक जयंतीच्या दिवशी घेतला आहे. मागील दीड वर्षानंतर कर्तारपूर कॉरिडॉर खुला झाला आहे. देवदिवाळी आणि गुरुनानक यांचे पावन प्रकाश पर्व असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. मोदींनी गुरुनानक जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. शेतकऱ्यांच्या विकासासाठी हे कायदे आणले होते. अनेक तज्ञांशी चर्चा करण्यात आली परंतु हे कायदे आता आम्ही रद्द करत असल्याची घोषणा नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी मानले मोदींचे आभार

पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंद सिंह यांनी कृषी कायदे रद्द केल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. त्यांनी हा निर्णय गुरु पर्वची भेट असल्याचे संबोधले आहे. तसेच शेतकऱ्यांच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी असेच सोबत मिळून काम करतील असा विश्वास असल्याचे कॅप्टन यांनी सांगितले आहे.


हेही वाचा :  देशातील शेतकऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना झुकवले, नवाब मलिकांची प्रतिक्रिया