घरCORONA UPDATEModi Govt 2.0 : कोरोनाविरोधी लढाईत मोदी सरकार अपयशी, परंतु राहुल गांधीपेक्षा...

Modi Govt 2.0 : कोरोनाविरोधी लढाईत मोदी सरकार अपयशी, परंतु राहुल गांधीपेक्षा मोदीच सरस- सर्वेक्षण

Subscribe

लॉकडाऊनबाबत बहुतेक लोक समाधानी

देशात कोरोना विषाणुच्या दुसऱ्या लाटेचा हैदोस सुरु आहे. यातच कोरोना काळात सी मतदार सर्वेक्षणाच्या माध्यमातून मोदी सरकारच्या दुसर्‍या कार्यकाळातील कामकाज, आव्हाने, कोरोना व्यवस्थापनेचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणानुसार, कोरोनाविरोधी लढाई जिंकण्यात मोदी सरकार अपयशी ठरल्याचे समोर आले आहे. या सर्वेक्षणात, कोरोना विषाणु देशातील सर्वात मोठा गंभीर मुद्दा नोंदवण्यात आला असून बहुतेक लोक लसीच्या तरतुदीबाबत समाधानी दिसले. त्याच वेळी, कोरोनाच्या दुसर्‍या लाटेच्या दरम्यान पंतप्रधान मोदींनी केलेला निवडणुकीतील प्रचार बहुतेक लोकांना पटले नसल्याचे म्हटले आहे.

केंद्रातील मोदी सरकारने यंदा ७ वर्षे पूर्ण केलीत. यात पंतप्रधान मोदींची ही दुसरी टर्म असून ज्याला २ वर्षे पूर्ण झाले आहेत. यातच कोरोना विषाणूने देशासह जगभरात हातपाय पसरले. या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सी-व्होटरने केंद्र सरकारचे कामकाज, पंतप्रधानांची लोकप्रियता आणि कोरोना संकटाशी निगडीत असलेल्या प्रश्नांसह एक सर्वेक्षण केले. चला जाणून घेऊया सर्वेक्षणानुसार लोकांचे विचार काय आहेत…

- Advertisement -

कोरोनाविरोधीतील लढाईत मोदी सरकार अपयशी

या सर्वेक्षणानुसार, कोरोना संकटाचा सामना करणे हे मोदी सरकारचे सर्वात मोठे अपयश असल्याचे समोर आले आहे. या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या शहरी भागातील ४४ टक्के लोकांनी कोरोना संकटाशी सामना करण्यात मोदी सरकार सफशेल अपयशी ठरल्याचे मत नोंदवले आहेत. तर ग्रामीण भागातील ४० टक्के लाोकांनीही या मताला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

कृषी कायदा, चीनसोबतच्या वादावर लोकांचे मत

तीन कृषी कायदे आणि शेतकर्‍यांच्या प्रश्नावर शहरी भागातील २० टक्के तर ग्रामीण भागातील २५ टक्के लोकांनी मोदी सरकारला सर्वात मोठे अपयश आल्याचे म्हटले आहे. CAA कायद्याविरोधात दिल्लीत उसळलेल्या दंगल हातळण्यात ९ टक्के शहरी आणि ९ टक्के ग्रामीण भागातील लोकांनी सरकारला अपयश आले असल्याचे म्हटले आहे. तर दुसरीकडे, ७ टक्के शहरी आणि १० टक्के ग्रामीण लोकांनीही चीन सीमा वाद मिटवण्यातही मोदी सरकार सफशेल अपयश आल्याचे म्हटले आहे.

- Advertisement -

या सर्वेक्षणात कोरोना विषाणुचे संकट हे देशातील सर्वात मोठी समस्या असल्याचे वर्णन केले आहे. तर ३६ टक्के लोकांनीही देशातील कोरोना विषाणुचे संकट सध्या सर्वात मोठी अडचण असल्याचे मत नमूद केले आहे. तर दुसरीकडे १८ टक्के लोकांनी बेरोजगारी, १० टक्के लोकांनी महागाई, ७ टक्के लोकांनी भ्रष्टाचार ही सर्वात मोठी समस्या असल्याचे म्हटले आहे.

लसीकरणाबद्दल लोकांचे मत

या सर्वेक्षणात, बहुतेक लोकांनी मोदी सरकारच्या लसीच्या व्यवस्थापनेवर योग्य आणि सकारात्मक मत नोंदवले आहे. यात शहरातील ५१ टक्के आणि ग्रामीण भागातील ४५ टक्के लोक म्हणाले की, सरकारने लसीकरण व्यवस्थापनेवर योग्य पद्धतीने केल्याचे म्हटले आहे. परंतु शहारातील बाकी २९ टक्के लोकांना हे लसीकरण व्यवस्थापन ठीक नसल्याचे म्हटले असून ग्रामीण भागातील हा आकडा ३७ टक्के आहे.

कोरोना महामारीत राहुल गांधीपेक्षा मोदीच सरस

कोरोना संकट सांभाळण्यात पंतप्रधान मोदी यशस्वी ठरले की राहुल गांधी यावर शहरी भागातील ६६ टक्के आणि ग्रामीण भागातील ६२ टक्के लोकांनी पंतप्रधान मोदींच्या नावाला पसंती दर्शवली. यात २० टक्के शहरी आणि २३ टक्के ग्रामीण भागातील लोकांनी राहुल गांधी ही कोरोनापरिस्थिती योग्यरित्या सांभाळू शकतात असे म्हटले आहे.

त्याचवेळी, सर्वेक्षणात सहभागी असलेल्या बहुतेक लोकांनी कोरोनाची लस परदेशात पाठविणे योग्य असल्याचे म्हटले आहे. शहरी भागातील ५४ टक्के आणि ग्रामीण भागातील ४५ टक्के लोकांनी लस परदेशात पाठविण्यास न्याय्य आहेत. तर २९ टक्के शहरी आणि ३७ टक्के ग्रामीण भागतील लोकांनी लसी परदेशात पाठवल्याचा मोदी सरकारचा निर्णय योग्य नसल्याचे म्हटले आहे.

लॉकडाऊनबाबत बहुतेक लोक समाधानी 

याशिवाय सर्वेक्षणातील लॉकडाऊनबाबत मोदी सरकारच्या निर्णयावर बहुतेक लोक समाधानी दिसले. तसेच बहुतेक लोक कोरोना कालावधीत आयोजित केलेल्या पंचायत निवडणुका तहकूब करण्याच्या बाजूने दिसू लागले. ६२ टक्के शहरी आणि ६० टक्के ग्रामीण लोक पंचायत निवडणुका तहकूब करण्याच्या बाजूने होती. त्याचबरोबर कोरोनाच्या दुसर्‍या लाटेदरम्यान बहुतेक लोक पंतप्रधान मोदींच्या निवडणूक प्रचार चुकी असल्याचे म्हणाले आहेत. सर्वेक्षणानुसार, कोरोना काळात कोणावर आपण सर्वात जास्त नाराज आहोत? या प्रश्नाला उत्तर देताना ३४ टक्के लोकांना केंद्र तर १७ टक्के लोकांनी राज्य सरकारला मत दिले आहे. तर ५४ टक्के लोकांनी या प्रश्नाच्या उत्तरात कोणतेही मत व्यक्त केले नाही.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -