घरदेश-विदेश'काँग्रेस मोदीची कबर खोदण्यात बिझी आणि मोदी रस्ते विकासात व्यस्त'

‘काँग्रेस मोदीची कबर खोदण्यात बिझी आणि मोदी रस्ते विकासात व्यस्त’

Subscribe

काँग्रेस मोदीची कबर खोदण्यात व्यस्त आहे आणि मोदी रस्ते विकास आणि गरीब कल्याणात व्यस्त आहे, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.

बंगळुरु – काँग्रेस मोदीची कबर खोदण्यात व्यस्त आहे आणि मोदी रस्ते विकास आणि गरीब कल्याणात व्यस्त आहे, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान मोदी आज कर्नाटक दौऱ्यावर आहेत. मांड्या येथे त्यांनी रोड शो केला. यावेळी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. त्यानंतर पंतप्रधान मोदींच्या हस्ते बंगळुरु – म्हैसूर एक्स्प्रेसवेचे लोकार्पण करण्यात आले. 118 किलोमीटर लांबीच्या या एक्स्प्रेसवेच्या निर्मितीसाठी 8,480 कोटी रुपये खर्च आला आहे.

एक्स्प्रेसवेच्या लोकार्पणानिमित्त कर्नाटक दौऱ्यावर आलेले पंतप्रधान म्हणाले, आज सागरमाला आणि भारतमाला सारख्या योजनांमुळे कर्नाटक आणि देशाचे रुप पालटत आहे. जेव्हा जग कोरोनाच्या संकटाचा सामना करत होतं तेव्हा भारताने आपल्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठीच्या बजेटमध्ये वाढ करुन एक सकारात्मक संदेश दिला होता. 2014 पूर्वी काँग्रेसचे सरकार केवळ गरीब कल्याणाच्या गप्पा करत होते. त्यांच्या विकासाच्या गप्पा करुन तो पैसा लूटला जात होता, असा आरोप मोदींनी केला.

- Advertisement -

बंगळुरु ते म्हैसूर अंतर आले 75 मिनिटांवर
बंगळुरु ते म्हैसूर एक्स्प्रेसवे सुरु झाल्यामुळे या दोन शहरांमधील अंतर कमी झाले आहे. यापूर्वी या प्रवासासाठी जवळपास तीन तास लागत होते, तेच अंतर आता अवघ्या ७५ मिनिटांवर आले आहे. बंगळुरु-निदाघट्टा-म्हैसूर हा NH-275 महामार्ग सहा लेनचा बनवण्यात आला आहे. यामुळे दोन्ही शहरांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाला हातभार लागणार आहे.
एक्स्प्रेसवे लोकार्पणानंतर मोदींनी म्हैसून-खुशालनगरला जोडणाऱ्या चौपदरी राज्यमार्गाचे भूमिपूजनही केले. 92 किलोमीटरच्या या महामार्गासाठी 4130 कोटी रुपये खर्च आपेक्षित आहे. यामुळे नागरिकांचा मोठा वेळ वाचणार आहे. पाच तासांचे अंतर अवघ्या अडीच तासांत पूर्ण केले जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -