घरताज्या घडामोडीभारताला उत्पादन केंद्र बनवायचे आहे..,एससीओ शिखर परिषदेत पंतप्रधानांचं मोठं वक्तव्य

भारताला उत्पादन केंद्र बनवायचे आहे..,एससीओ शिखर परिषदेत पंतप्रधानांचं मोठं वक्तव्य

Subscribe

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी एससीओ शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी उझबेकिस्तान येथे गेले आहेत. यावेळी त्यांनी सहभागी विविध देशातील प्रमुख नेत्यांना संबोधित केले. परिषदेला संबोधित करताना मोदींनी हिंदीमध्ये भाषण केले. यावेळी त्यांनी भारताची अर्थव्यवस्था यावर्षी ७.५ टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा असल्याचे सांगितले. तसेच आम्हाला भारताला उत्पादन केंद्र बनवायचे आहे, असे मोठे वक्तव्य देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले.

- Advertisement -

पंतप्रधानांनी चांगल्या कनेक्टिव्हिटीची गरज असल्याचे सांगितले. आम्हाला एकमेकांच्या देशांतून जाण्याची परवानगी दिली पाहिजे. त्याचवेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत मॅन्युफॅक्चरिंग हब बनण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही स्टार्टअप्स आणि इनोव्हेशनवर विशेष कार्यगट स्थापन करून SCO सदस्य देशांसोबत आमचा अनुभव शेअर करण्यास तयार आहोत, असे मोदी म्हणाले.

मोदींनी आपल्या भाषणात कोरोना आणि युक्रेन संकटाचा मुद्दा उपस्थित केला. साथीचा रोग आणि युक्रेनच्या संकटाचा जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम झाला आहे. यामुळे जगाचे अन्न आणि ऊर्जा संकट निर्माण झाले आहे, असेही ते म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : उद्धव ठाकरे जे विचार देतील ते सोनिया गांधींचेच असतील, रामदास कदमांची


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -