घरताज्या घडामोडीकेंद्र सरकार कोणत्याही विषयावर चर्चेसाठी तयार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन

केंद्र सरकार कोणत्याही विषयावर चर्चेसाठी तयार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन

Subscribe

विरोधकांच्या आणि सर्वपक्षीय नेत्यांच्या भावना पंतप्रधानांनी जाणून घेणं आवश्यक आहे.

संसदेचे पावसाळी अधिवेशनाच्या पुर्वी रविवारी सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती. १९ जुलै २०२१ पासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु होणार आहे. सर्वपक्षीय बैठकीसाठी संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी वेग-वेगळ्या राजकीय पक्षांना बैठकीचं आमंत्रण दिलं होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडली आहे. सर्व पक्षीय बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित करताना म्हटलं आहे की, सरकार विविध विषयांवर संसदेत नरोगी आणि अर्थपुर्ण चर्चेसाठी तयार आहे. या सर्वपक्षीय बैठकीमध्ये ३३ राजकीय पक्षांनी समावेश घेला होता.

संसदेचे पावसाळी अधिवेशनापुर्वी सर्वपक्षीय बैठक आयोजित केली जाते. या सर्वपक्षीय बैठकीला ३३ राजकीय पक्षांचा सहभाग होता तर ४० हून अधिक सदस्य उपस्थित होते. संसदेचे पावसाळी अधिवेशन १९ जुलैपासून सुरु होत असून १९ दिवसांचे कामकाज चालणार आहे. १३ ऑगस्टरोजी संसदेचे पावसाळी अधिवेशनचा अखेरचा दिवस असेल. या १९ दिवसांच्या कार्यकाळात २ आर्थिक विधेयकांसह ३१ विधेयके मांडण्यात येणार आहेत.

- Advertisement -

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, उद्योगमंत्री पीयूष गोयल, लोकसभा काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी, टीएमपी खासदार डेरेक ओ ब्रायन, शिवसेना खासदार संजय राऊत या सर्वपक्षीय बैठकीसाठी हजर राहिले होते. केंद्रीय मंत्रिमंडळात नव्याने बदल करण्यात आला आहे. यामध्ये काही नव्या नेत्यांना मंत्रिपद देण्यात आले आहे तर काही मंत्र्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. या सर्व नेत्यांचे संसदीय सभागृहात सदस्य म्हणून शपथविधी होईल.

- Advertisement -

मोदींची ३ मिनिटांची उपस्थिती

संसदेच्या अधिवेशनापुर्वी संसदीय कार्यमंत्र्यांद्वारे सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात येते या बैठकीला सर्व विरोधी पक्षातील नेते आणि सत्ताधारी उपस्थित राहतात. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी शेवटचे ३ मिनिट असताना या बैठकीला हजर राहिले होते. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली. विरोधकांच्या आणि सर्वपक्षीय नेत्यांच्या भावना पंतप्रधानांनी जाणून घेणं आवश्यक आहे. यामुळे पंतप्रधान यांनी सुरुवातीपासून हजर राहून नेत्यांशी चर्चा करायला हवी होती अशी विरोधकांची अपेक्षा होती.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -