घरदेश-विदेशमोदींचा संदेश म्हणजे निरर्थक निबंध - अखिलेश यादव

मोदींचा संदेश म्हणजे निरर्थक निबंध – अखिलेश यादव

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाला समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी निरर्थक निबंध म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी रात्री देशाला संबोधित केलं. यावर टिका करताना समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला दिलेल्या संदेशाला निरर्थक निबंध म्हटलं आहे. ट्विटमध्ये पंतप्रधानांचं नाव न घेता त्यांनी लक्ष्य केलं आहे. देशातील मजूर आणि गरीब नागरिक मदतीची पेक्षा करत होते, परंतु त्यांना केवळ व्यर्थ निबंध ऐकायला मिळाला, असा टोला त्यांनी लगावला आहे. अखिलेश यादव यांनी ट्विट करत मोदींचं नाव न घेता टिका केली आहे.

अखिलेश यादव ट्विटमध्ये म्हणाले की, देशातील मजूर आणि गरीब लोक त्यांच्यावर आलेल्या आपत्तीची व्यवस्था करण्याची अपेक्षा करत होते, परंतु त्यांना केवळ व्यर्थ निबंध ऐकायला मिळाला. अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळे केलेल्या भाषणात रस्त्यांवरून चालणाऱ्या मजुरांप्रति संवेदना नव्हती. सर्वांना विचार करा. असंवेदनशील आणि दुर्दैवी, असं शेवटी लिहिलं आहे.

- Advertisement -

भाजप सरकारच्या अल्पदृष्टी निर्णयामुळे अडचणींमध्ये वाढ

भाजपा सरकारच्या अल्पदृष्टी निर्णय आणि कामकाजात नियोजन व समन्वयाचा अभाव यामुळे समस्या कमी होण्याऐवजी वाढत आहेत. श्रीमंत लोकांसाठी रेल्वे सुविधा आणि गरीबांना संकटात सोडण्याच्या भाजपच्या डावपेचांमुळे लोकांमध्ये तीव्र नाराजी आणि असंतोष आहे. मदत तर लांबच गरीब आणि कामगारांबद्दलचा सरकारचा दृष्टिकोनही अपमानजनक होत आहे, असं समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव म्हणाले.


हेही वाचा – मोदींनी जाहीर केलं २० लाख कोटींच आर्थिक पॅकेज, लॉकडाऊन ४ची घोषणा!

- Advertisement -

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, संतापलेल्या मजूर-कामगारांना समजलं आहे की सरकारकडे कोणतेही उपचार किंवा औषध नाही. अशा सरकारवर विश्वास ठेवता येत नाही. प्रतापगडमध्ये प्रवासी मजुरांना बसमध्ये बसवताना शिवीगाळ करत लाथ मारल्यामुळे माणुसकीला काळीमा फासल्या सारखं आहे. ते म्हणाले की जर आपण थकलेल्या, निराश आणि हतबल कामगारांचा सन्मान करू शकत नाही तर कमीतकमी अपमान करू नका. दोषी कर्मचार्‍यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -