घरताज्या घडामोडीमोरबी दुर्घटनेत 143 जणांचा मृत्यू; पंतप्रधानांचे सर्व कार्यक्रम रद्द, चौकशीसाठी एसआयटी स्थापन

मोरबी दुर्घटनेत 143 जणांचा मृत्यू; पंतप्रधानांचे सर्व कार्यक्रम रद्द, चौकशीसाठी एसआयटी स्थापन

Subscribe

गुजरातच्या मोरबीमध्ये मच्छू नदीवरील पूल कोसळून 143 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. रविवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना असून, अजूनही बचावकार्य घटनास्थळी सुरू आहे. या दुर्घघटनेने संपूर्ण गुजरातला हादरा बसला आहे.

गुजरातच्या मोरबीमध्ये मच्छू नदीवरील पूल कोसळून 143 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. रविवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना असून, अजूनही बचावकार्य घटनास्थळी सुरू आहे. या दुर्घघटनेने संपूर्ण गुजरातला हादरा बसला आहे. तसेच, याच दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द झाल्याचे समजते. (pm narendra modi all programs cancelled due to gujarat cable bridge collapse 143 death)

गुजरातमधील मच्छू नदीत बचावकार्याला गती देण्यासाठी लष्कराची मदत घेतली जात आहे. SDRF सोबत NDRF ची पथके शर्तीच्या प्रयत्नांनी बचावकार्य करत आहेत. बचाव कार्यादरम्यान नागरिकांचे मृतदेह आढळून येत आहेत. यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. जवळपास 12 तास उलटुन गेले तरी, बचावकार्य सुरू आहे. सद्यस्थितीत मृतांच्या शोधासाठी ड्रोनचा वापर केला जात असल्याची माहिती समोर येत आहे.

- Advertisement -

आज दुपारपर्यंत बचावकार्य पूर्ण होण्याची शक्यता आहे. बचाव कार्यासाठी केंद्रीय यंत्रणांसह अग्निशमन दल, तटरक्षक दल, गरुड कमांडो आणि नौदलाची मदत घेतली जात आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांपैकी बहुतांश मोरबी आणि आसपासच्या भागातील रहिवासी आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि गृहमंत्री हर्ष संघवी रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी उपस्थित होते.

तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी मोरबीला भेट देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचे अनेक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. या अपघाताबाबत पंतप्रधान मोदी सतत मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या संपर्कात आहेत. दुसरीकडे भाजपने आपले सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.

- Advertisement -

1 नोव्हेंबर ला गांधीनगर येथे होणारा पेज समिती प्रमुखांचा दिवाळी मिलन कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह हे मोरबीला जाणार आहेत. दरम्यान, 31 ऑक्टोबरपासून सुरू होणारी राज्यव्यापी परिवर्तन संकल्प यात्रा काँग्रेसने पुढे ढकलली आहे.

चौकशीसाठी एसआयटी स्थापन

  • मोरबीच्या दुर्घटनेच्या चौकशीसाठी सरकारने विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे.
  • या पाच सदस्यीय टीममध्ये आर अँड बी सचिव संदीप वसावा, आयएएस राजकुमार बेनिवाल, आयपीएस सुभाष त्रिवेदी,
  • मुख्य अभियंता केएम पटेल यांच्यासह डॉ. गोपाल टांक यांचा समावेश आहे.
  • हे विशेष तपास पथक अपघाताचे कारण शोधणार आहे.

दुर्घटनेप्रकरणी कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल

  • मोरबी अपघातप्रकरणी दोषींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  • कलम ३०४, ३०८, ११४ गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
  • गृह राज्यमंत्री हर्ष संघवी यांनी ट्विट करून या प्रकरणी माहिती दिली.
  • मोरबीचा हा ऐतिहासिक पूल नुकताच ओरेवा नावाच्या कंपनीने ताब्यात घेतला.
  • निविदेतील अटींनुसार कंपनीने पुलाची पुढील 15 वर्षे देखभाल करायची होती.
  • सात महिन्यांच्या दुरुस्तीनंतर 26 नोव्हेंबरला कंपनीने तो पूल लोकांसाठी खुला केला.

हेही वाचा – मोरबी पूल दुर्घटना : पंतप्रधानांकडून आर्थिक मदतीची घोषणा

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -