घरदेश-विदेशश्रीलंकेच्या अध्यक्षांनी मोदींना दिली समाधीस्थ बुद्धाची मूर्ती भेट

श्रीलंकेच्या अध्यक्षांनी मोदींना दिली समाधीस्थ बुद्धाची मूर्ती भेट

Subscribe

भेट स्वरूपात देण्यात आलीली मूर्ती पांढऱ्या सागाच्या लाकडात कोरलेली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मालदीवचा दौरा केल्यानंतर ते श्रीलंकेच्या दौऱ्यावर गेले असता श्रीलंकेचे अध्यक्ष मैत्रीपाल सिरिसेना यांची रविवारी भेट घेतली. यावेळी मोदींनी श्रीलंकेत दाखल झाल्यानंतर दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहिली. ईस्टरच्या बॉम्बहल्ल्यानंतर श्रीलंकेला भेट देणारे मोदी हे पहिले परदेशी नेते आहेत. एप्रिलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत हा देश श्रीलंकेच्या सोबत असल्याचे संकेत या भेटीच्या माध्यमातून देण्यात आले.

- Advertisement -

या भेटीदरम्यान दहशतवादाचा धोका हा भारत आणि श्रीलंका या दोन्ही देशांना सारखाच आहे, त्यामुळे त्याविरोधात योग्य ती पावलं उचलली पाहिजे. या मुद्द्यावर भारताचे पंतप्रधान मोदी आणि श्रीलंकेचे अध्यक्ष मैत्रीपाल सिरिसेना यांच्यात एकमत झाले.

- Advertisement -

समाधीस्थ बुद्धाची मूर्ती भेट

यावेळी पंतप्रधान मोदींना श्रीलंकेच्या अध्यक्षांनी समाधीस्थ रूपात असणाऱ्या बुद्धाची मूर्ती भेट स्वरूपात दिली. ही बुद्धाची मूर्ती पंतप्रधान मोदींना भेट दिल्यानंतर सिरिसेना यांनी विशेष मित्राला दिलेली ही विशेष भेट आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने ट्वीट संदेशात म्हटले आहे.

मोदींना भेट स्वरूपात देण्यात आलेली मूर्ती पांढऱ्या सागाच्या लाकडात कोरलेली असून ही मुर्ती तयार करण्यास साधारण दोन वर्षाचा कालावधी लागला होता. अनुराधापूर युगामधील सर्वोत्तम शिल्पांपैकी ही सागाची मूर्ती विशेष मानली जाते. विशेषतः ही बुद्धाची मूर्ती चौथ्या आणि सातव्या शतकातील असल्याने ती खास असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -